ETV Bharat / bharat

भाजप नेते रमण सिंहांच्या जावयावर ५० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप; 'लुकआऊट नोटीस' जारी - Economics Malpractices

पुनीत गुप्ता हे रायपूर येथे सरकारी रुग्णालयामध्ये अधीक्षक होते. त्यावेळी त्यांनी तेथे ५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप त्यांच्यावर आहे.

पुनीत गुप्ता
author img

By

Published : Apr 6, 2019, 9:30 AM IST

रायपूर - भाजप नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे जावई डॉ. पुनीत गुप्ता यांच्या विरोधात रायपूर पोलिसांनी 'लुक आऊट नोटीस' जारी केली आहे. जवळपास ५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भाजपसाठी मोठी डोकेदुखी होण्याचे कारण होऊ शकते.

पुनीत गुप्ता हे रायपूर येथे सरकारी रुग्णालयामध्ये अधीक्षक होते. त्यावेळी त्यांनी तेथे ५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी २ नोटीस पाठवल्यावरही गुप्तांकडून काहीच उत्तर न आल्यामुळे लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. गुप्तांच्या विरोधात १५ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शनिवारी काँग्रेसने राज्यात पत्रकार परिषद घेऊन पुनीत गुप्तांच्या गैरव्यवहाराविषयी तपशील मांडला. पुनित गुप्ता यांनी ६० कोटींचे वैद्यकीय साहित्य विकत घेण्याऐवजी १२० कोटी रुपयांमध्ये साहित्य विकत घेतले. रुग्णालयाला महिन्याचे १.५० कोटी रुपये येतात. मात्र, भाजप सरकार ४ कोटी रुपये खर्च करत होती. काँग्रेस सरकारच्या काळात आपण २ कोटी रुपये खर्च करत आहोत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

पुनीत गुप्ता यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणार छत्तीसगड न्यायालयामध्ये शनिवारी सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवलेली वही मागीतली आहे. तर, या प्रकरणात १२ एप्रिलला पुढील सुनावणीचे आदेश न्यायालायाने दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.