अमरावती (आंध्र प्रदेश)- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांना मोठा फटका बसला आहे. आंध्र प्रदेशमध्ये रोजगारासाठी आलेला छत्तीसगडचा एक व्यक्ती गावाकडे मुलांना कावडीमध्ये ठेवून गावाकडे निघाला होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मदत करत त्याला गावाकडे पाठवण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.
कावडीत मुलांना घेऊन कडप्पा जिल्ह्यातून निघालेला व्यक्ती कुटुंबासह पायी चालत छत्तीसगडकडे निघाला होता. पोलीस कर्मचारी जगदीश, शिवराम मलैया यांनी त्यांची चौकशी केली. त्याची समस्या जाणून घेत गावाकडे जाण्यासाठी पोलिसांनी वाहनाची व्यवस्था केली.
पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे लहान मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास सुखकर झाला.