भोपाळ : आशियातील सर्वात मोठा सौरप्रकल्प मध्य प्रदेशमध्ये उभारला जात आहे. 'रेवा अल्ट्रा मेगा सोलार प्लांट' हा ७५० मेगावॅट क्षमतेचा असणार आहे. १० जुलैला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या सौरप्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याचे उद्घाटन करतील.
राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली. सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांनी राज्य उर्जा मंत्री आर. के. सिंह यांची भेट घेत त्यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
अक्षय्य उर्जास्त्रोतांना चालना देण्यासाठी देश पुढाकार घेतो आहे. गेल्या वर्षीच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीमध्ये स्वखर्चाने उभारलेल्या सौरप्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केले होते.
हेही वाचा : भारतात आतापर्यंत घेतल्या 1 कोटी कोरोना चाचण्या...