नवी दिल्ली - तीन देशांचा दौरा करून आज पंतप्रधान मोदी भारतात पोहोचले. आज सकाळी ११ वाजता त्यांनी दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जेटली यांचे निधन झाले, तेव्हा मोदी परदेश दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी तीन देशांना भेट दिली. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होता. त्यामुळे ते जेटलींच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहू शकले नव्हते.
-
PM @narendramodi visits the family of late Union Minister and BJP leader #ArunJaitley; pays tribute to him and extend condolences to the bereaved family pic.twitter.com/kDlkUVUZFd
— Doordarshan News (@DDNewsLive) August 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM @narendramodi visits the family of late Union Minister and BJP leader #ArunJaitley; pays tribute to him and extend condolences to the bereaved family pic.twitter.com/kDlkUVUZFd
— Doordarshan News (@DDNewsLive) August 27, 2019PM @narendramodi visits the family of late Union Minister and BJP leader #ArunJaitley; pays tribute to him and extend condolences to the bereaved family pic.twitter.com/kDlkUVUZFd
— Doordarshan News (@DDNewsLive) August 27, 2019
मोदींचा परदेश दौरा २२ ऑगस्टपासून २६ ऑगस्टपर्यंत चालला. यादरम्यान मोदींनी फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहारीन या देशांनाही भेट दिली. याच काळात अरुण जेटली यांचे २४ ऑगस्टला निधन झाले. त्यामुळे मोदी जेटलींच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच, जेटली कुटुंबीयांनीही परदेश दौरा अर्ध्यावर सोडून येऊ नका, अशी विनंती पंतप्रधान मोदींना केली होती. आज सकाळी भारतात पोहोचल्यानंतर मोदी जेटली कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
मोदींचा ३ देशांचा दौरा भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय सहकार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. जी-७ परिषदेचे सदस्यत्व नसतानाही फ्रान्सच्या आमंत्रणावरून भारताचे प्रतिनिधी म्हणून मोदी या परिषदेला उपस्थित राहिले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडे धाव घेत पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काश्मीर मुद्द्यावर भारताचा दृष्टीकोन जगासमोर मांडणे आणि समर्थन मिळवणे भारतासाठी आवश्यक होते. पंतप्रधान मोदींनी जी-७ देशांसमोर आणि विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ही भूमिका स्पष्टपणे मांडली. काही देशांनी या मुद्द्यावर भारताला पाठिंबाही व्यक्त केला होता. पाठिंबा व्यक्त करणाऱ्या या देशांना मोदी भेट देणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले होते. या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय सहकार्यासह बहारीन आणि यूएई या देशांचे सर्वोच्च सन्मानही पंतप्रधान मोदींना मिळाले.