ETV Bharat / bharat

बिहार रणसंग्राम : समस्तीपूरमधील प्रचारसभेत मोदींचा काँग्रेस, तेजस्वीवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचारासाठी समस्तीपूर येथे आले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, आपण सर्व येथील जंगलराजच्या युवराजला व्यवस्थित पाहत आहात.

author img

By

Published : Nov 1, 2020, 3:51 PM IST

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

समस्तीपूर (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचारासाठी येथे आले. आज प्रचाराचा अंतिम दिवस असून संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे. छपरानंतर पंतप्रधान मोदी समस्तीपूर येथे पोहोचले. तेथे झालेल्या प्रचारसभेतील प्रमुख मुद्दे -

  • मंचावर मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित
  • केंद्र सरकारच्या मदतीने समस्तीपूरला इंजीनियरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालय मिळाले - मुख्यमंत्री नितीश कुमार

काय म्हणाले मोदी -

  • बिहारच्या सर्व राज्यात विजयाचे वातावरण; इथे उसळलेल्या गर्दीमुळे विजयाचा संकल्प पाहत आहे.
  • मोठमोठे राजनितिज्ञ म्हणाले, निवडणूक नाही होणार, मात्र, बिहारच्या जनतेने त्यांना खोटे सिद्ध केले
  • ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक आधीच म्हणाले आहेत, बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच (एनडीए) जिंकेल
  • पहिल्या टप्प्यातील मतदान करणाऱ्या सर्वांना धन्यवाद.
  • प्रत्येक सर्वेक्षण एनडीए जिंकण्याचा दावा करत आहेत. त्यामागे ठोस कारण आहे.
  • महिलांना आमच्या सरकारने, नितीश सरकारने सर्व प्रकारची संधी दिली
  • बिहारमधील तरुणींचेही एनडीएला समर्थन
  • आयुष्यभर धुक्यात राहिलेल्या बहिणी ज्यांना उज्ज्वला योजनेच्या मार्फत गॅस मिळाला, त्यादेखील आज आमच्यासोबत आहेत
  • दिवाळी आणि छटपुजेपर्यंत ज्यांना मोफत रेशन मिळत आहे, ते कधीतरी भटकत होते. त्यांच्यापर्यंत सरकार आता स्वत: पोहोचत आहे. हे परिवारही आज एनडीएच्या सोबत आहेत.

हेही वाचा - काँग्रेसलाच मत द्या.. भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधियांची जीभ घसरली !

तेजस्वी यादववर निशाणा -

राष्ट्रीय जनता दलाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावरही मोदी यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, आपण सर्व येथील जंगलराजच्या युवराजला व्यवस्थित पाहत आहात. काँग्रेस पक्ष संकुचित होत आहे. याआधी मोदी म्हणाले की, बिहारमध्ये बिहारी आहेत. ही ती भूमी आहे, जिने संपूर्ण जगाला लोकशाहीची शिकवण दिली. जनतेच्या हितासाठी जेव्हा निर्णय घेतले जातात, जेव्हा त्या निर्णयात लोगसहभाग असतो. तेव्हाच लोकशाही मजबूत होते.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री दिवंगत सरदार पटेल यांची आठवण करताना मोदी म्हणाले, सरदार साहेब काँग्रेसचा हिस्सा होते. मात्र, घराणेशाहीमुळे याच परिवाराने काल (31 ऑक्टोबर) त्यांच्या जयंतीच्या औचित्यावर काँग्रेसने त्यांची आठवणही नाही केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.