लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे जाऊन कुंभस्नान केले. मोदींनी पूजा-अर्चना करून सफाई कर्माचाऱ्यांचे पाय धुतले. उत्तर प्रदेश सरकारने या सन्मानासाठी ५ सफाई कर्माचाऱ्यांची निवड केली होती.
मोदींनी या ५ सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून ते टॉवेलने पुसून काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, ज्या सफाई बंधू आणि भगिनींचे पाय धुवून मी वंदना केली आहे. हा क्षण आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिल, असे मोदींनी म्हटले आहे. त्यांचा आशीर्वाद, त्यांचे प्रेम, सर्वांचेच आशीर्वाद माझ्यावर कायम असेच असू द्या. अशीच मी आपली सेवा करत राहावी, हीच माझी इच्छा आहे, असेही मोदी म्हणाले.