हैदराबाद - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तेलंगणा सरकारला '2015 अलायर एन्काऊंटर' प्रकरणातील मृताच्या कुटुंबीयाला 5 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्देश दिले आहेत. या निर्दशानुसार सरकारने मृताच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि एमबीटी नेते अमजेद उल्लाह खान यांनी केली आहे.
एमबीटी नेते अमजेद उल्लाह खान यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. वकारुद्दीन अहमद, सैय्यद अमजद अली, मोहम्मद झाकिर, मोहम्मद हनीफ आणि इज़हार खान अशी अलायर एन्काऊंटरमधील मृताची नावे आहेत. यांना वारंगळ केंद्रीय तुरुगांतून हैदराबाद न्यायालयात आणण्यात येत होते. यावेळी 7 एप्रिल 2015 रोजी नालगोंडा जिल्ह्यात अलायर येथे पोलीसांनी त्यांचे एन्काऊंटर केले होते. एन्काऊंटरमध्ये करण्यात आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 5 लाख निधी येत्या 4 आठवड्याच्या आतमध्ये देण्याचे सांगितले आहे. हे पाचही जणांना तीन केसेसमध्ये आरोपी दर्शवले होते.
ज्येष्ठ वकील मोहम्मद उस्मान यांनी संबधित एन्काऊंटरविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 12 स्पटेंबर 2018 ला मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. मात्र, तेलंगणा सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निर्देशाचे पालन केले नव्हते.