ETV Bharat / bharat

भारतात आतापर्यंत घेतल्या 1 कोटी कोरोना चाचण्या...

author img

By

Published : Jul 6, 2020, 1:46 PM IST

गेल्या 24 तासांत 1 लाख 80 हजार 596 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण 1 कोटी 4 हजार 101 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्या ह्या 1 हजार 105 प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

नवी दिल्ली - देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भाराताने आतापर्यंत तब्बल 1 कोटी कोरोना चाचण्या घेतल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 1 लाख 80 हजार 596 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण 1 कोटी 4 हजार 101 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्या ह्या 1 हजार 105 प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत. 778 सरकारी, 317 खासगी, आरटी-पीसीआर 592, ट्रूनॅट 421 आणि सीबीएनएएटी 92,या प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचार हे एकमेव मार्ग आहेत. आयसीएमआरने संबंधित राज्य सरकार, सार्वजनिक आणि खासगी संस्थांना आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

आयसीएमआरच्या सल्लागारांनी सांगितले की, देशातील प्रत्येक भागातील लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी चाचणी उपलब्ध करुन देण्यात यावी आणि संसर्ग रोखण्यासाठी संपर्क ट्रेसिंग यंत्रणा आणखी बळकट करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करणाऱया पहिल्या 5 राज्यांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.