ETV Bharat / bharat

देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 52 हजार 509 नवे रुग्ण - देशातील कोरोना रुग्ण संख्या

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 लाख 8 हजार 255 झाला आहे. यात 5 लाख 86 हजार 244 अ‌ॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 12 लाख 82 हजार 216 जण पूर्णत: बरे झाले आहेत, तर 39 हजार 795 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 5, 2020, 1:42 PM IST

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 19 लाखांचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 52 हजार 509 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 857 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 लाख 8 हजार 255 झाला आहे. यात 5 लाख 86 हजार 244 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तसेच 12 लाख 82 हजार 216 जण पूर्णत: बरे झाले आहेत, तर 39 हजार 795 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 2 लाख 99 हजार 356 कोरोनाबाधित असून 16 हजार 142 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 2 लाख 8 हजार 784 कोरोनाबाधित, तर 4 हजार 349 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 48 हजार 376 कोरोनाबाधित असून 2 हजार 533 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 1 लाख 25 हजार 226 कोरोनाबाधित तर 4 हजार 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशभरामध्ये आतापर्यंत 2 कोटी 14 लाख 84 हजार 402 कोरोना चाचण्या केल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 6 लाख 19 हजार 652 कोरोना चाचण्या केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने याबाबत माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.