नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या (शनिवारी) फाशी दिली जाणार आहे. दरम्यान, दोषी पवन गुप्ताने न्यायालयात फेरयाचिका दाखल केली आहे. घटना घडली तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा पवनने केला होता. यासंबधीची याचिका आधीच फेटाळण्यात आली आहे. मात्र, आता त्याने नव्याने याचिका दाखल केली आहे.
आधी दाखल केलेली याचिका न्यायाधीश भानुमती, अशोक भूषण आणि ए. एस बोपन्ना यांच्या पीठाने रद्दबातल ठरवली होती. पवन गुप्ताचे वकील ए. पी. सिंह यांनी यावर पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली आहे. सिंह यांनी याचिक दाखल केल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दोषी मुकेश सिंहची याचिका बुधवारी फेटाळली
गुन्हा घडला तेव्हा दिल्लीमध्ये नसल्याचा दावा मुकेश सिंहने याचिकेत केला होता. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका काल फेटाळली. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णय सदोष असून यामध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजेश सेठी यांनी मत नोंदविले.
निर्भया प्रकरणातील दोषींनी कायदेशीर मार्गांचा वापर करत ३ वेळा डेथ वॉरंट रद्द केला. त्यामुळे प्रत्येक वेळी दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. आता उद्या आरोपींना फाशी देणे नियोजित आहे.