ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : पोलिसांविरूद्ध गुन्हा दाखल करा, दोषी पवन गुप्ताची मागणी..

मंडोली तुरुंगात असताना दोन पोलिसांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी, तसेच काठीने मारहाण केली होती. यामध्ये आपल्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, असा आरोप पवन गुप्ताने केला आहे.

author img

By

Published : Mar 11, 2020, 5:46 PM IST

Nirbhaya case: Convict seeks FIR against policemen
निर्भया प्रकरण : पोलिसांविरूद्ध गुन्हा दाखल करा, दोषी पवन गुप्ताची मागणी..

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने, पोलिसांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल केली आहे. आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका त्याने दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी बुधवारी मंडोली तुरुंग प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

मंडोली तुरुंगात असताना दोन पोलिसांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी, तसेच काठीने मारहाण केली होती. यामध्ये आपल्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, असा आरोप पवन गुप्ताने केला आहे.

याप्रकरणी न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून उत्तर मागवले असून, याबाबतची पुढील सुनावणी गुरुवारी होणार असल्याचे जाहीर केले. निर्भया प्रकरणी पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि मुकेश कुमार या चौघांना २० मार्चला पहाटे ५.३० वाजता फाशी होणार आहे.

हेही वाचा : COVID-19 : 'डेल' अन् 'माईंडट्री'चे दोन कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.