इस्लामाबाद - पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेल्सवरती गमतीशीर गोष्टी घडत असतात. याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. अॅपल कंपनीच्या व्यवसायाला सफरचंदाचा व्यवसाय म्हणालेल्या निवदिकेचा असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर या व्हिडिओवर मजेशीर कमेंट येत आहेत.
पाकिस्तानची पत्रकार नायला इनायत यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये टीव्ही चॅनेलवरती चर्चा चालू असलेली दिसत आहे. यामध्ये एक तज्ञ निवेदिकेला अॅपलचा व्यवसाय हा पाकिस्तानच्या बजेटपेक्षा मोठा आहे. परंतु, निवेदिकेला अॅपलचा व्यवसाय म्हणजे सफरचंदाचा व्यवसाय असा भ्रम होतो. ती म्हणते, मी ऐकले होते की एका सफरचंदाचा किती मोठा व्यवसाय असू शकतो. यावर तज्ञ म्हणतो, मी सफरचंद व्यवसायचे बोलत नाही तर, अॅपल मोबाईल कंपनीविषयी बोलत आहे.
नेटिझन्सनी व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले आहे, हा न्यूज चॅनेल चालू आहे, की कॉमेडी शो चालू आहे.
यामुळेच लोक म्हणतात, एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरापासून दुर ठेवतात. परंतु, मनोचिकित्सकापासून दूर ठेऊ शकत नाही.
तज्ञाला सलाम, मी त्याच्या ठिकाणी असतो तर, हसून हसून खूर्चीवरुन पडलो असतो.
गरीब बेचारी, आताही फक्त घरचाच विचार करत आहे.