चित्रदुर्ग - पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील सभेत विरोधकांवर हल्लाबोल केला. 'जेव्हा भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तेव्हा भारतातील अनेकांना दुःख झाले. इथले (कर्नाटकातील) मुख्यमंत्री आणखी एक पाऊल पुढे गेले. आपल्या सुरक्षा दल आणि सैनिकांच्या वीरतेविषयी बोलू नये. यामुळे त्यांच्या 'व्होट बँके'ला धक्का बसतो. मी त्यांना विचारू इच्छितो, की त्यांची 'व्होट बँक' भारतात आहे की, पाकिस्तानात,' असे मोदी म्हणाले.
'हतबल सरकार कसे असते, ते आपण पाहात आहात. कर्नाटकातील सरकार कोण चालवत आहे, याचा कुणीही अंदाज लावू शकणार नाही. २ हरलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. ते एकमेकांना सांभाळण्यातच व्यग्र आहेत,' असे मोदी म्हणाले.