नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील लोकांनी घरातच राहून रमजान ईदचा सण साजरा करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे. जीवनात मी पहिल्यांदाच घरात नमाज पाडत असल्याचेही नक्वी म्हणाले.
जगभरासह देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. अशा स्थितीत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ईदची उत्सव मुस्लीम बांधवांनी घरातच साजरा करावा. नमाजही घरात पाडावा, असे आवाहन नक्वी यांनी केले आहे.