जयपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांसाठी लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. 14 एप्रिल पर्यंत हा लाॅकडाऊन असणार आहे. मात्र, 14 नंतर लाॅकडाऊन हटवला जाईल का वाढवला जाईल? यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, मला वाटत नाही 14 नंतर पूर्ण लाॅकडाऊन राहील. ज्या क्षेत्रात कोरोनाचे एकही पाॅझिटिव्ह रुग्ण नाही तेथील लाॅकडाऊन हलवला जाईल, असे मत आपत्ती व्यवस्थापन मंत्री भंवरलाल मेघवाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
ज्या विधानसभा क्षेत्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तेथील लाॅकडाऊन काढला काढावा. त्यामुळे त्या क्षेत्रातील शेतकरी भाजीपाली बाजारात आणू शकतील. तसेच शाळाही सुरू झाल्या पाहीजे. कार्यालयामध्येही काही प्रमाणात कर्मचारी बोलाबून कार्यालये सुरू झाली व्हावीत. मात्र, कलम 144 लागू ठेवले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, 11 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहेत. त्यात लाॅकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.