ETV Bharat / bharat

#CAA आंदोलनादरम्यान मुस्लिम व्यक्तीने वाचवले पोलिसाचे प्राण

उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी सीएए विरोधी आंदोलनांनी हिंसक वळण घेतले होते. फिरोजाबादमध्येही अशाच एका आंदोलनात, २० डिसेंबरला अजय कुमार या पोलीस अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण करण्यात येत होती. यामध्ये त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा हाजी कादीर या व्यक्तीने, त्यांना जमावापासून वाचवत आपल्या घरी नेले, आणि परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन सोडले.

Man saved UP cop from mob during CAA protest
#CAA आंदोलनादरम्यान जखमी पोलिसाचे वाचवले प्राण
author img

By

Published : Dec 27, 2019, 8:49 AM IST

लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण करण्यात होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हा हाजी कादीर नावाच्या एका व्यक्तीने त्यांचे प्राण वाचवले होते. २० डिसेंबरला फिरोजाबादमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना काल (गुरुवार) प्रकाशात आली आहे.

  • Ajay Kumar: Hajji Qadir sahab took me to his home, I had injuries on one of my fingers,& head. He gave me water and his clothes & assured I will be safe. He took me to the police station later. He came like an angel in my life, had it not been for him, I would have been killed. pic.twitter.com/IBDwhfhrg4

    — ANI UP (@ANINewsUP) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलने होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले होते. फिरोजाबादमध्येही अशाच एका हिंसक आंदोलनात, २० डिसेंबरला अजय कुमार या पोलीस अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण करण्यात येत होती. यामध्ये त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा हाजी कादीर या व्यक्तीने, त्यांना जमावापासून वाचवत आपल्या घरी नेले, आणि परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन सोडले.

हाजी कादीर यांनी मला त्यांच्या घरी नेले. माझ्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली होती. त्यांनी मला पाणी दिले, आणि स्वतःकडील कपडे मला घालण्यास दिले. मी त्यांच्या घरात सुरक्षित असल्याची खात्रीही त्यांनी मला दिली. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर त्यांनी मला पोलीस ठाण्यात नेऊन सोडले, अशी माहिती कुमार यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की हाजी एका देवदूताप्रमाणे तिथे आले. ते आले नसते, तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो.

या घटनेबाबत बोलताना कादीर म्हणाले, की त्यावेळी मी नमाज पढत होतो. तेव्हा मला समजले की बाहेर काही लोक एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करत आहेत. मी तिथे जाऊन पाहिले, तर त्यांना बऱ्याच जखमा झाल्या होत्या. मग, माणुसकीच्या नात्याने मी त्यांना घरी आणले, आणि इथे तुम्ही सुरक्षित असल्याची खात्री दिली.

  • Hajji Qadir: I was reading namaaz when I was told a policeman has been surrounded by the mob. He was severely injured, I assured him that I will save him. I didn't know his name at the time, what I did was for humanity. https://t.co/00lqTYvDB9 pic.twitter.com/ZKPeDAk1u4

दरम्यान, आज जुम्मा प्रार्थना शांततेत पार पडावी यासाठी उत्तर प्रदेशमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्रालयातील एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनांमध्ये गुरूवारपर्यंत १९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर २८८ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आतापर्यंत ३२७ गुन्हे नोंदवण्यात आले असून, ५,५५८ लोकांना सुरक्षेच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : 'काँग्रेस, ओवेसी, तुकडे तुकडे गँग देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छिते'

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.