ETV Bharat / bharat

काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, म्हणाले... 'माझ्या आमंत्रणाला व्यवसाय समजले' - काश्मीर प्रशासन

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, काश्मीर प्रशासनाने त्यांना परत पाठवले. त्यावर राहुल गांधी माझ्या आंमत्रनाला व्यवसाय समजले, असे काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी सांगितले

काश्मीरच्या राज्यपालाचा राहुल गांधीवर हल्लाबोल,
author img

By

Published : Aug 26, 2019, 4:34 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, काश्मीर प्रशासनाने त्यांना परत पाठवले. त्यावर राहुल गांधी माझ्या आंमत्रनाला व्यवसाय समजले. आमच्यावर विश्वास नसेल तर काश्मीरचा दौरा करा, असे आंमत्रन मी त्यांना दिले होते. मात्र त्यांनी नजरकैदीतील लोकांना आणि नेत्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांची ही अट मान्य करू शकत नाही', असे काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

  • J&K Governor, SP Malik in Delhi: Rahul Gandhi has made my invitation an unending business. I had said if you don't believe us then come & visit, later he said I'll meet ppl under house arrest, will meet Army. I said I can't accept these conditions & leave it to administration. pic.twitter.com/Vrrf6Zrg19

    — ANI (@ANI) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी विरोधी नेत्यांसह काश्मीर दौऱ्यावर गेले होते. मात्र काश्मीर प्रशासनाने त्यांना परत पाठवले. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळामुळे काश्मीरमध्ये लागू असलेल्या संचारबंदीचेही उल्लंघन होईल, असे जम्मू प्रशासनाने म्हटले.

जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला, अशी टीका केली होती.

तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देऊ. आम्हाला तुमच्या विमानाची गरज लागणार नाही. मात्र, कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि काश्मीरमधील लोक, तेथील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा, असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांना दिले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.