नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर जागतिक महामारी कोरोना विषाणूचा देखील परिणाम झाला आहे. परंतु, अधिवेशन यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी सरकारकडून पूर्ण तयारी केली जात आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठका एकदिवसाआड असतील.
संसदेच्या अधिवेशनात सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना नियामांचे पालन करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठका एकदिवसाआड होणार आहेत. तसेच या अधिवेशनामध्ये 11 अध्यादेश प्राथमीकतेने पुर्ण करण्याचा दबाव आहे. हे अधिवेशनामध्ये चीन-भारत तणावादरम्यान होत आहे. पावसाळी अधिवेशन चार आठवडे चालण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ सँनिटाईजर्स दिले जाणार आहे.
दरम्यान मार्चच्या सुरूवातीला दोन्ही सभागृहात 19 विधेयके (लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 1) सादर करण्यात आली. वित्त विधेयक मंजूर करण्यासह अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 मार्च रोजी संपले होते. परंपरेनुसार पुढील अधिवेशन सहा महिन्यांचा कालावधी संपण्यापूर्वी घ्यावे लागते. त्यामुळे पावसाळी अधिवेशन 23 सप्टेंबरपूर्वी सुरू करावे लागेल. दरवर्षी पावसाळी अधिवेशन जुलै-ऑगस्ट महिन्यात होते पण, करोनामुळे ते पुढे ढकलावे लागले असून आता ते सप्टेंबरच्या पूर्वार्धात होणार आहे.