ETV Bharat / bharat

पाकचा दहशतवाद्यांवर कारवाईचा देखावा, दाऊद कुठे आहे ते सर्वांनाच ठाऊक आहे - परराष्ट्र मंत्रालय - pakistan

'आता दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणी रहस्य राहिलेला नाही. पाकिस्तानने दाऊदला भारताच्या हवाली करावे. मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचे आता जगजाहीर आहे. आताच्या हाफिझ सईद विरोधातील दिखाऊ कारवाईवर भारताचा मुळीच विश्वास नाही.' असे रवीश कुमार म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालय
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:22 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानने हाफिझ सईद विरोधात कारवाईचे पाऊल उचलले असले तरी त्यावर भारताचा मुळीच विश्वास नाही. पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जमाल-उल-दवाचा म्होरक्या हाफिझ सईदवर दहशतवादाचे आरोप ठेऊन त्याच्या अटकेची खात्री दिली आहे. पण, हा सर्व डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. पाकिस्तानचा दहशतवाद्यांवर कारवाई करत असल्याचा देखावा करत असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

  • Raveesh Kumar, MEA: The location of Dawood Ibrahim is not a secret. Time & again we have been presenting to Pakistan a list of people who are in their country. We've asked repeatedly that he should be handed over. His imprint on the Mumbai blast is very clear for all of us to see pic.twitter.com/2zUNYVEDGO

    — ANI (@ANI) July 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'भारताला दहशतवादमुक्त वातावरण आणि पाकिस्तानसोबत त्यावर आधारित शांततेचे संबध हवे आहेत. पाकिस्तानने त्यांच्या देशातून चालणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी अजूनपर्यंत ठोस पावले उचललेली नाहीत. अशा वरवरच्या कारवाईने काही होणार नाही,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यानी म्हटले आहे. साधारण ३ महिन्यांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या पथकाला हाफिज सईदची चौकशी करू देण्यास नकार दिला होता.

  • R Kr,MEA: You(Pak)claim that you've taken action but when it comes to taking action against people who we have demanded you go into denial mode. On the other hand you try to project to int'l community that you are taking some action against the terrorists operating from the soil https://t.co/dNqvip1zfI

'आता दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणी रहस्य राहिलेला नाही. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांच्या देशात राहणाऱ्या आणि भारतात दहशतवाद पसरवणाऱ्यांची यादी देत आहोत. दाऊदला भारताच्या हवाली करावे, असे आम्ही वारंवार म्हणत आहोत. मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचे आता जगजाहीर झाले आहे,' असे रवीश कुमार म्हणाले.
  • Raveesh Kumar, MEA: This basically is a case of double standards, this is something where they stand completely exposed as far as their claims of taking action against terror groups in Pakistan is concerned.

'आम्ही जी मागणी करतो, त्याला तुम्ही नकार देता. संयुक्त राष्ट्रांकडून कठोर कारवाई केली जाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी दिखाऊ कारवाई करता. अशा कारवायांना काही अर्थ नाही. हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा आहे.' असे रवीश कुमार म्हणाले.

Intro:Body:

-------------

पाकिस्तानचा दहशतवाद्यांवर कारवाईचा देखावा, दाऊद कुठे आहे ते सर्वांनाच ठाऊक आहे  - परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली - पाकिस्तानने हाफिझ सईद विरोधात कारवाईचे पाऊल उचलले असले तरी त्यावर भारताचा अजिबात विश्वास नाही. पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जमाल-उल-दवाचा म्होरक्या हाफिझ सईदवर दहशतवादाचे आरोप ठेऊन त्याच्या अटकेची खात्री दिली आहे. पण हा सर्व डोळयात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. पाकिस्तानचा दहशतवाद्यांवर कारवाई करत असल्याचा देखावा करत असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

'भारताला दहशतवादमुक्त वातावरण आणि पाकिस्तानसोबत त्यावर आधारित शांततेचे संबध हेव आहेत. पाकिस्तानने त्यांच्या देशातून चालणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी अजूनपर्यंत ठोस पावले उचललेली नाहीत. अशा वरवरच्या कारवाईने काही होणार नाही,' असे प्रराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यानी म्हटले आहे. साधारण ३ महिन्यांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या पथकाला हाफिज सईदची चौकशी करू देण्यास नकार दिला होता.

'आता दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणी रहस्य राहिलेला नाही. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांच्या देशात राहणाऱ्या आणि भारतात दहशतवाद पसरवणाऱ्यांची यादी देत आहोत. दाऊदला भारताच्या हवाली करावे, असे आम्ही वारंवार म्हणत आहोत. मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचे आता जगताहीर झाले आहे,' असे रवीश कुमार म्हणाले.

'आम्ही जी मागणी करतो, त्याला तुम्ही नकार देता. संयुक्त राष्ट्रांकडून कठोर कारवाई केली जाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी दिखाऊ कारवाई करता. अशा कारवायांना काही अर्थ नाही. हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा आहे.' असे रवीश कुमार म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.