ETV Bharat / bharat

मनीष सिसोदिया आणि एससीइआरटी यांच्यात शिक्षण प्रणाली सुधारण्याबाबत लाईव्ह चर्चा

author img

By

Published : Apr 17, 2020, 12:09 PM IST

स्टेट काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग (एससीईआरटी) महाराष्ट्र आणि लीडरशिप फॉर इक्विटी (एलईएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लाईव्ह चर्चेत शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांनी त्यांच्या शिक्षा मॉडेलबद्दल चर्चा केली.

CERT Maharashtra and LEF
मनीष सिसोदिया आणि एससीइआरटी महाराष्ट्र यांच्या शिक्षण प्रणाली सुधारण्याबाबत झाली लाईव्ह चर्चा

नवी दिल्ली - शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या शिक्षण टीमसोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांनी ऑनलाईन चर्चा केली. या लाईव्ह चर्चेत मनीष सिसोदीया यांनी दिल्लीच्या शिक्षण प्रणालीत बदल घडवून आणण्यासाठी अमलात आणलेले विचार आणि उचललेली पाऊले याबद्दल माहिती दिली. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील शिक्षण अधिकाऱ्यासोबत इतर विषयांवर देखील चर्चा केली.

या विषयांवर झाली चर्चा -

विद्यार्थ्यांचा मानसिक विकास

स्टेट काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग (एससीईआरटी) महाराष्ट्र आणि लीडरशिप फॉर इक्विटी (एलईएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लाईव्ह चर्चेत शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांनी त्यांच्या शिक्षा मॉडेलबद्दल चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षण हीच दिल्ली सरकारची प्राथमिकता आहे. आमचे लक्ष्य नेहमीच आमच्या सर्व शाळांसाठी एक मानक ठरवण्यावर राहिले आहे. काही मोजक्या शाळांवर आम्ही लक्ष दिलेले नाही. तसेच विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षित करू शकतो. मात्र, त्यांचा योग्य मानसिक विकास करणे सगळ्यात महत्वाचे आहे.

शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर -

अॅडवाइजर टू डायरेक्टर एज्युकेशन शैलेंद्र शर्मा यांनी सांगितले, की आपण बघतोय की दिल्ली सरकारची प्राथमिकता शिक्षणला राहिली आहे. एकूण बजेटचा एक चतुर्थांश भाग हा शिक्षणासाठी वापरला जात आहे. आपल्याला सरकारचे ध्येय समजण्याची गरज आहे. यासोबतच वाचनालय उघडणे, प्रयोगशाळेत केले जाणारे बदल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार यावरही चर्चा केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षकांची ट्रेनिंग -

शैलेंद्र शर्मांनी सांगितले, की शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेनिंग देण्यात आले. त्यांना इतर देशात पाठविले त्याचा उद्देश त्यांची नक्कल करणे, हा नव्हता तर त्यांनी तेथून नवीन गोष्टी शिकाव्यात आणि त्याची अंमलबजावणी इथे करावी, हा होता असे सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीला सर्वच बाबतीत भागीदारी दिली. त्यांना ५ ते ७ लाखांचा निधी ठरवून देण्यात आला. त्यामुळे तेही योग्य पद्धतीने काम करत आहेत.

मिशन बुनियाद आणि हॅप्पीनेस करीकुलम -

विविध कार्यक्रम आयोजित करून पालकांमध्ये उत्साह वाढवला आणि त्यांचा सहभाग वाढवला. यामुळे पालक आणि मुलांमधील नाते अधिक मजबूत होण्यास मदत झाली. तसेच त्यांच्याशी मिशन बुनियाद आणि हॅप्पीनेस करीकुलम याबद्दलही चर्चा केली. या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होत आहे. त्यांच्या वैयक्तीक जीवनातही सकारात्मक बदल झाले आहेत.

मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात -

महाराष्ट्र शिक्षण टीमने मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात केल्याची माहिती विशाल सोळंकी यांनी दिली. हे शाळेतील मुल्यांवर आधारीत शिक्षा कार्यक्रम आहेत. ज्याची सुरुवात काही वर्षांपूर्वी झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुलांमध्ये संवैधानिक मुल्ये रुजवतो, असे सोळंकी यांनी सांगितले.

एससीईआरटी महाराष्ट्र आणि इक्विटी फॉर लीडरशिप यांच्या माध्यमातून आयोजित या सत्रात दिल्ली सरकारकडून एज्यूकेशन डायरेक्टर बिनय भूषण, अॅडवाइजर टू डायरेक्टर एजुकेशन शैलेंद्र शर्मा आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया सहभागी झाले. तर, महाराष्ट्राकडून महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख सचिव डॉ. वंदना कृष्णा शालेय शिक्षण आणि खेळ विभाग, जिल्हा शिक्षणाधिकारी नाशिक वैशाली वीर आणि लीडरशिप फॉर इक्विटीच्या सीईओ मधुकर बनुरी सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.