ETV Bharat / bharat

केरळ विमान अपघात: हरवलेल्या चिमुरड्याची सोशल मीडियाच्या मदतीनं पुन्हा पालकांशी भेट - कोझिकोड विमान अपघात

साबीर अली असे या लहान मुलाचे नाव आहे. अपघातानंतर बचाव पथकाने मदतकार्य हाती घेतले होते. जखमी अवस्थेत मुलगा सापडल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुलाची पालकांपासून ताटातूट झाली होती.

केरळ विमान अपघात
केरळ विमान अपघात
author img

By

Published : Aug 8, 2020, 2:49 PM IST

कोझिकोड - केरळमधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल(शुक्रवारी) रात्री एअर इंडियाच्या विमानाचा लँडिग करताना अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. तसेच विमानाचे दोन तुकडे होऊन विमान शेजारील दरीत कोसळले. या अपघातानंतर हरवलेल्या एका चिमुरड्याची पुन्हा पालकांशी भेट झाली आहे.

साबीर अली असे या लहान मुलाचे नाव आहे. अपघातानंतर बचाव पथकाने मदतकार्य हाती घेतले तेव्हा जखमी अवस्थेत एक लहान मुलगा सापडला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुलाची पालकांपासून ताटातूट झाली होती. अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर मुलाचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर मुलाची ओळख पटली. आज पालकांकडे मुलाला सुपुर्द करण्यात आले.

कोझिकोडमधील विमान अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मदत करण्यासाठी दिल्ली आणि मुंबईवरून दोन विशेष विमाने पाठविण्यात आली आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस विमानाच्या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, विमानातील चार कर्मचारी सुरक्षित आहेत. जखमी प्रवाशांना मल्लापुरम आणि कोझिकोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

190 प्रवाशांना घेवून दुबईवरून एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान कोझिकोड विमानतळावर येत होते. मात्र, खाली उतरत असताना विमान धावपट्टीवरून घसरले. अपघातात विमानाचे दोन तुकडे झालेे. शुक्रवारी रात्री 8 च्या दरम्यान हा अपघात झाला. कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात आणण्यासाठी ही विमानसेवा सुरु होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.