ETV Bharat / bharat

कोरोनावर उपचार करताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार एक कोटींची मदत!

केजरीवाल यांनी सांगितले, की कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर, नर्स, इतर वैद्यकीय सहाय्यक किंवा तेथील सफाई कर्मचारी या सर्वांसाठी ही सन्मान राशी उपलब्ध असणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना हुतात्म्यांचा दर्जाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

author img

By

Published : Apr 1, 2020, 4:34 PM IST

Kejriwal govt to give 1 crore compensation to the family of healthcare staff if they lose life while treating corona
कोरोनावर उपचार करताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना मिळणार एक कोटींची मदत, दिल्ली सरकारची घोषणा!

नवी दिल्ली - कोरोनावर उपचार करताना एखाद्या वैद्यकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत देण्याची घोषणा केजरीवाल सरकारने केली आहे. ही योजना सरकारी आणि खासगी दोन्ही ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीमधील कोरोनासाठी समर्पित केलेल्या पाच सरकारी रुग्णालयाच्या प्रमुखांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. त्यानंतर केजरीवाल यांनी ही घोषणा केली.

केजरीवाल यांनी सांगितले, की कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर, नर्स, इतर वैद्यकीय सहाय्यक किंवा तेथील सफाई कर्मचारी या सर्वांसाठी ही सन्मान राशी उपलब्ध असणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना हुतात्म्यांचा दर्जाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केजरीवाल म्हणाले, की एक कोटी रुपये हे नक्कीच कोणाच्या प्राणांहून अधिक नाहीत. १००-२०० कोटी रुपयांशीही कोणाच्या प्राणांची तुलना होऊ शकणार नाही. मात्र, सन्मान निधी म्हणून ही रक्कम आपण या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना देणार आहोत.

यासोबतच, या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यानंतरही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास त्यांनी त्वरीत सरकारशी संपर्क साधावा त्यांना आवश्यक ती पूर्ण मदत आम्ही करू, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : आयसीएसच्या ५ हजार कोचचे विलगीकरण कक्षात रूपांतर, रेल्वेचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.