ETV Bharat / bharat

जेपी नड्डा 'चिराग' प्रज्वलित करून नितीश कुमारांसाठी खड्डा खोदत आहेत - कन्हैया कुमार - बिहार विधानसभा निवडणूक

जेपी नड्डा 'चिराग' प्रज्वलित करून नितीश कुमार यांच्यासाठी खड्डा खोदत आहेत. डबल इंजिनच्या सरकारचे माहीत नाही, मात्र या निवडणुकीत एक चालक असून दोन खलासी आहेत हे माहिती झाले. दोन्ही सत्तेसाठी लढा देत आहेत, अशी टीका सीपीआयचे नेते कन्हैया कुमार यांनी भाजप नेते जेपी नड्डांवर केली.

कन्हैया कुमार
कन्हैया कुमार
author img

By

Published : Nov 1, 2020, 8:23 PM IST

Updated : Nov 1, 2020, 9:28 PM IST

कटिहार - जेपी नड्डा 'चिराग' प्रज्वलित करून नितीश कुमार यांच्यासाठी खड्डा खोदत आहेत. डबल इंजीनच्या सरकारचे माहित नाही, मात्र या निवडणुकीत एक चालक असून दोन खलासी आहेत हे माहिती झाले. दोन्ही सत्तेसाठी लढा देत आहेत. अशी टीका सीपीआयचे नेते कन्हैया कुमार यांनी भाजप नेते जेपी नड्डांवर केली. तसेच, ही निवडणूक नाही, तर लुटारू सरकारला बदलन्यासाठीचे जन आंदोलन आहे, असे देखील कुमार यांनी सांगितले.

माहिती देताना सीपीआय नेते कन्हैया कुमार

येत्या ७ नोव्हेंबरला कटिहार जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर आज कन्हैया कुमार हे प्राणपूर विधानसभा मंतदारसंघातील आजम नगर येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी उपरोक्त टीका केली. यावेळी कुमार यांनी जनतेला महागठबंधनकडून काँग्रेसचे उमेदवार तौकीर आलम यांना मत देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, प्राणपूर मतदारसंघात तौकीर आलम यांचा सामना भाजपच्या निशा सिंह यांच्याशी असणार आहे. २०१५ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे विनोद कुमार हे निवडून आले होते. त्यांना ४७ हजार ९२४ मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार इसरत परवीन यांना ८ हजार १०१ मतांच्या फरकाने पराभूत केले होते.

हेही वाचा- रेल्वे मालगाड्या बंद केल्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे जे.पी नड्डांना पत्र

Last Updated : Nov 1, 2020, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.