नवी दिल्ली - देशभक्तीच्या विषयावर आधारीत राष्ट्रीय चित्रपट महामंडळद्वारे (एनएफडीसी) आयोजित शार्ट फिल्म फेस्टिवलचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अभिजीत पॉल यांची शार्ट फिल्म 'अॅम आय' (Am I) विजेता ठरली आहे. तसेच यानंतर देबोज संजीव यांची 'अब इंडिया बनेगा भारत' दुसऱ्या तर युवराज गोकुल यांची '10 Rupees' ही तिसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शार्ट फिल्म फेस्टिवलच्या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
-
Heartiest congratulations to the winners of #NFDC #ShortFilm #Contest on the theme of '#Patriotism -Marching towards #Atmanirbharta' & thank you to all the participants for their outstanding contribution in making this competition a roaring success! #PatrioticFilmFestival pic.twitter.com/gy9DoA1a3b
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Heartiest congratulations to the winners of #NFDC #ShortFilm #Contest on the theme of '#Patriotism -Marching towards #Atmanirbharta' & thank you to all the participants for their outstanding contribution in making this competition a roaring success! #PatrioticFilmFestival pic.twitter.com/gy9DoA1a3b
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) August 21, 2020Heartiest congratulations to the winners of #NFDC #ShortFilm #Contest on the theme of '#Patriotism -Marching towards #Atmanirbharta' & thank you to all the participants for their outstanding contribution in making this competition a roaring success! #PatrioticFilmFestival pic.twitter.com/gy9DoA1a3b
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) August 21, 2020
दरम्यान, काही शार्ट फिल्मना स्पेशल सर्टिफिकेटही देण्यात आले आहे. यामध्ये शिवा बिरदार यांची 'रिस्पेक्ट- ए फॉर बी फॉर' , समीर प्रभु यांची 'बिज आत्मनिर्भरतेचे', पुरु प्रियमची 'मेड इन इंडिया', शिवराजची माईन्ड युवर बिझनेस ('Mind Y(Our) Business), मध्य प्रदेश माध्यम फिल्म 'हम कर सकते हैं', प्रमोद आरची 'Kaanda Kaigalu (Unseen Hands)', राम किशोरची 'सोल्जर' आणि राजेश बी ची 'आत्मवंदन फॉर नेशन' चा समावेश आहे.
राष्ट्रीय चित्रपट महामंडळ (एनएफडीसी) आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयने स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने देशभक्ती- आत्मनिर्भर भारताच्या थिमवर शार्ट फिल्म फेस्टिवल आयोजित केले होते. शार्ट फिल्म जमा करण्याची तारीख 7 ऑगस्ट होती. पहिल्या स्थानावर येणाऱ्या शार्ट फिल्मला 1 लाख, तर दुसऱ्या स्थानावरील शार्ट फिल्मला 50 हजार आणि तिसरे स्थान पटकवणाऱ्या विजेत्याला 25 हजार रुपये पुरस्कार देण्यात आला आहे.