ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णसंख्या आता 18 लाखांवर; 38 हजार 135 जणांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासांत तब्बल 52 हजार 972 कोरोना रुग्ण सापडले असून 771 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाची रुग्णसंख्या आता 18 लाख 3 हजार 696 वर पोहोचली, तर आजवर एकूण 38,135 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 3, 2020, 12:22 PM IST

Updated : Aug 3, 2020, 1:13 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 लाखांवर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत तब्बल 52 हजार 972 कोरोना रुग्ण सापडले असून 771 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 18 लाख 3 हजार 696 वर पोहोचली. आजवर एकूण 38,135 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 5 लाख 79 हजार 357 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 11,86,203 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 4 लाख 41 हजार 228 वर पोहोचली आहे, तर सध्या 1 लाख 48 हजार 843 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 15 हजार 576 जणांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूमध्ये सध्या 56 हजार 998 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4 हजार 132 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 10 हजार 356 कोरोना रुग्ण सक्रिय असून 4 हजार 4 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत देशात 2 कोटी 2 लाख 2 हजार 858 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत, तर रविवारी 3 लाख 81 हजार 27 चाचण्या एकाच दिवसात घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राज्यस्थानसारख्या राज्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोनाने देशभरात थैमान घातलेलं असतानाच अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रविवारी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही रविवारी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

अनेक कंपन्या कोरोनावर लस तयार करत आहेत. भारतीय औषध नियंत्रक विभागाने (डीसीजीआय) सिरम इन्स्टीट्यूटला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करणार आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या व्हॅक्सीनचे नाव आहे. भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. जगभरात अनेक लसी विकसित केल्या जात असून ऑक्सफर्डची लस त्यापैकी एक आहे.

Last Updated : Aug 3, 2020, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.