ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांमध्ये आढळले 8 हजार 392 कोरोनाबाधित ; 230 जणांचा बळी - latest corona count

राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रामध्ये एकूण 67 हजार 655 कोरोनाबाधित असून यामध्ये 36 हजार 40 अॅक्टीव्ह केसेस आहेत. तर 2 हजार 286 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 1 हजार 38, दिल्लीमध्ये 473 आणि मध्यप्रदेशमध्ये 350 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jun 1, 2020, 12:34 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 8 हजार 392 कोरोनाबाधित आढळले असून 230 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख संख्येच्या जवळ पोहचला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 90 हजार 535 झाला आहे, यात 93 हजार 322 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 91 हजार 819 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 5 हजार 394 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रामध्ये एकूण 67 हजार 655 कोरोनाबाधित असून यामध्ये 36 हजार 40 अॅक्टीव्ह केसेस आहेत. तर 2 हजार 286 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 1 हजार 38, दिल्लीमध्ये 473 आणि मध्यप्रदेशमध्ये 350 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

दरम्यान आतापर्यंत अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश , दादरा-नगर हवेली, गोवा, लडाख, मणिपूर नागालँड, मिझारोम, सिक्कीम, त्रिपूरा आणि पुडुचेरीमध्ये एकाही कोरोनबाधिताचा मृत्यू झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.