ETV Bharat / bharat

#Monsoon2020 : देशभरात पाणीच पाणी... महाराष्ट्रातही अलर्ट जारी! - छत्तीसगड पूर

भारतीय पर्जन्य संस्थेने ओडिशा तेलंगणा राज्यांना तसेच चंडीगढला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येणाऱ्या चोवीस तासांत या राज्यांसह महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

flood in maharashtra
महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
author img

By

Published : Aug 17, 2020, 2:47 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा आणि चंदीगढला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचसोबत उत्तर भारतासह दिल्लीतही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येणाऱ्या 48 तासांत देशातील विविध भागांत जोरदार पाऊस होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पूरपरिस्थिती टाळण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली आहे.

बिहार आणि आसाम..

मागील काही दिवसांपासून आसाम आणि बिहारमध्ये नद्यांनी उग्ररुप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात पूर आला होता. मात्र, या राज्यांतील परिस्थिती आता पूर्ववत होण्याचे संकेत आहे. अनेक भागांतील पुराचे पाणी ओसरले असून जनजीवन पूर्ववत होत आहे. बिहारमधील 16 जिल्ह्यांत मिळून 81 लाख 44 हजार 356 नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदत पोहोचवली आहे.

आसाममध्ये आतापर्यंत 11 हजार 812 नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. धेमजी, लखीमपूर आणि बक्सा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ओडिशात मुसळधार पाऊस बसरत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत पूरसदृष्ट परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी वाहतूक बंद खोळंबली असून शेतीला देखील नुकसान झाले आहे. ओडिशा आणि तेलंगणात पावसातील घटनांमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी बलंगीर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोघांचा भिंत पडल्याने मृत्यू झाला.

तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात एका ५० वर्षांच्या महिलेचा तिच्या मुलीसह मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोघींच्या अंगावर जीर्ण भिंत कोसळली.

महाराष्ट्र..

पुणे आणि साताऱ्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचसोबत मुंबई, रायगड आणि पालघरसह किनारपट्टी भागात जोरदार सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत हा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या चोवीस तासांत 204.5 मिमी पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.या भागात रेड अलर्ट जाहीर झालाय. येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्रासह तेलंगणा आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. 52 हजार 146 क्युसेकने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सद्यपरिस्थितीत कोयना धरण 86 टक्के भरले आहे. पाऊस वाढल्यानंतर वसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

छत्तीसगढ..

छत्तीसगढमध्ये सतत पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या आपत्ती निवारण विभाग सक्रिय झाला असून बस्तर जिल्ह्यातील दक्षिण भागांत वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी जिल्हाधिकारी सर्व संबंधित अधीक्षकांना आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.