ETV Bharat / bharat

'चीन घुसखोरीबाबत सत्य लपवणारे देशविरोधी'; राहुल यांचा नवा व्हिडिओ जारी - भारतीय लष्कर

तुम्ही राजकारणी म्हणून मला शांत बसायला आणि खोटे बोलायला सांगत असाल तर तसे मी करू शकणार नाही. मी अनेक माजी लष्करातील लोकांशी बोललो आहे. काही सॅटेलाईट फोटोसुद्धा बघितले आहेत. मी देशवासियांशी खोटे बोलणार नाही. मला ते शक्य होणार नाही, असेही गांधी या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

'चीन घुसखोरीबाबत सत्य लपवणारे देशविरोधी'; राहुल यांचा नवा व्हिडिओ जारी

author img

By

Published : Jul 27, 2020, 1:11 PM IST

नवी दिल्ली - घुसखोरीबाबत खोटे बोलणारे खरे देशभक्त नाहीत, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला आहे. टि्वट केलेल्या नव्या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. चीनकडून गलवान खोऱ्यात झालेली घुसखोरी आणि त्याप्रकरणी केंद्र सरकारची भूमिका याविषयावर राहुल यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

'चीनने भारतीय भूमी बळकावली आहे. सत्य लपवणे आणि त्यांना तसे करू देणे हा देशद्रोह आहे. हे सत्य लोकांसमोर आणणे हीच खरी देशभक्ती आहे', असे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल यांनी टि्वटवर काही दिवसांपासून व्हिडिओ सिरिज सुरू केली आहे. त्यातील हा चवथा व्हिडिओ राहुल यांनी नुकताच टि्वट केला आहे. 'भारतीय म्हणून देश आणि येथील जनता यालाच माझे प्राधान्य आहे, असेही राहुल म्हणाले.

  • The Chinese have occupied Indian land.

    Hiding the truth and allowing them to take it is anti-national.

    Bringing it to people’s attention is patriotic. pic.twitter.com/H37UZaFk1x

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आता हे स्पष्ट झाले आहे की चीनने आपल्या भुभागात घुसखोरी केली आहे. यामुळे मला प्रचंड मनस्ताप झाला. माझे रक्त सळसळले. अशाप्रकारे एखादा देश दुसऱ्या देशाच्या भुभागामध्ये कसा प्रवेश करू शकतो, असा सवालही गांधी यांनी उपस्थित केला. तुम्ही राजकारणी म्हणून मला शांत बसायला आणि खोटे बोलायला सांगत असाल तर तसे मी करू शकणार नाही. मी अनेक माजी लष्करातील लोकांशी बोललो आहे. काही सॅटेलाईट फोटोसुद्धा बघितले आहेत. मी देशवासियांशी खोटे बोलणार नाही. मला ते शक्य होणार नाही, असेही गांधी या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

राहुल यांनी १७ जुलै रोजी पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या विदेशनितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर 20 जुलै रोजी राहुल यांनी दुसरा व्हिडिओ जारी करून मोदींनी सत्तेत येण्यासाठी स्वत:ची बनावट स्ट्राँगमॅन प्रतिमा बनवली असल्याचा आरोप केला होता. तसेच 23 जुलैला जारी केलेल्या तिसऱ्या व्हिडिओत गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. एका माणसाची प्रतिमा ही संपूर्ण देशाचे व्हिजन बनू शकत नसल्याचे राहुल यांनी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.