ETV Bharat / bharat

कोरोनाशी लढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर..

अलिबाबाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करत अशी निदानात्मक प्रणाली विकसित केली आहे की, सेकंदात ती कोरोना विषाणुला शोधते. आतापर्यंत, ९६ टक्के अचूकता असलेल्या रुग्णांना तिने शोधले आहे. आरोग्यसेवा कर्मचारी आणि रुग्णालयांच्या मदतीला ही नवी प्रणाली धावून आली आहे.

help-of-technology-in-fighting-corona-virus
कोरोनाशी लढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर..
author img

By

Published : Mar 29, 2020, 1:29 PM IST

दक्षिण कोरिया, तैवान आणि चीन यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्टफोन्स आणि बिग डेटाचा उपयोग करून कोविड-१९ महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. उर्वरित जगाने या देशांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. दक्षिण कोरियात दुसऱ्या सर्वाधिक संख्येच्या रुग्णांची नोंद झाली असली तरीही, मृतांचा आकडा खूप कमी आहे. चीनच्या शेजारी असलेल्या तैवानमध्ये, त्यापेक्षाही कमी मृतांचा आकडा नोंदवला आहे.

दक्षिण कोरिया सरकार बिग डेटाचा उपयोग करून रुग्णांची संख्या, ते रहात असलेल्या भागांची नावे, लिंग आणि वय, मृतांचा आकडा अशी माहिती गोळा करत आहे. पीडितांना एक ओळख क्रमांक देण्यात येतो. त्यांचे तपशील गोपनीय ठेवले जातात. दक्षिण कोरियाच्या बुलेटिनमधील एक उदाहरण : रुग्ण क्रमांक १०२ आणि तिच्या मित्राने के१ आणि के२ आसनांवरून एका विशिष्ट चित्रपटगृहात बसून एक चित्रपट पाहिला. ते चित्रपटगृहात अमुक टॅक्सीने गेले. रुग्ण क्रमांक १५१ ने अमुक हॉटेलमध्ये जेवण केले. रुग्ण क्रमांक ५८७ स्थानिक रेल्वेमधून पार्टीला गेला होता, जेथे तो २० लोकांना भेटला. तेथे एक वेबसाईटही आहे जी नागरिकांना संसर्गग्रस्तांच्या दिनक्रमाची माहिती दिली जाते. स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही वेबसाईट चालवली जाते. या माहितीमुळे नागरिकांना संसर्गग्रस्त भागात टाळण्यासाठी मदत करते. सरकारने जीपीएस, कॉल डेटा आणि अनेक एप तयार केले आहेत आणि ते फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप यांना जोडले आहेत. हे एप रुग्णांच्या हालचालींना ओळखण्यात सहाय्य करतात. त्यामुळे लोक घाबरण्याऐवजी, कोणत्या भागात जाणे टाळायला हवे, हे निश्चित करू शकतात. सामाजिक अंतर राखण्याचे महत्व ते समजून घेतात. ही सरकारी वेबसाईट आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कृती करण्यास मदत करते.

कोविड-१९ च्या उद्रेकानंतर थोड्या काळातच, तैवानने राष्ट्रीय आरोग्य कमांड सेंटर सुरू केले. देशात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांवर सरकारने निर्बंध घातले; बिग डेटाचा उपयोग करत संसर्गग्रस्त निश्चित केले. समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांना आळा घातला. राष्ट्रीय आरोग्य विमा धोरणे, स्थलांतर, सीमा शुल्क, रुग्णालयांना भेटी, विमानाच्या तिकिटांची क्यू आर कोड्स याबाबत माहितीचा एक डेटाबेस तयार करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गॉरिदम्सचा वापर करून लोकांना वारंवार सतर्क करण्यात आले. यामुळे रुग्णांच्या प्रवासाचा इतिहासावर नजर ठेवणे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना सोपे झाले. बिग डेटाचा उपयोग करून, अधिकारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना व्यक्तिच्या आरोग्याविषयक स्थितीची माहिती देण्यास सक्षम ठरले. हे आरोग्याच्या स्थितीचे संदेश हेच पासेस म्हणून वापरण्यात आले. एनसीओव्ही जेथे उच्च प्रमाणात आढळला होता, त्याभागांमध्ये लक्षणे असलेल्या रूग्णांना शोधण्यात आले आणि त्यांना मोबाईल फोन ट्रॅकिंगचा उपयोग करून विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य कमांड केंद्राने मास्क्सचा पुरवठा वाढवला आणि त्यांच्या किमतींवर नियंत्रण ठेवले. चेहऱ्याला लावायचे मास्कचा साठा असलेल्या औषधी दुकानांचा नकाशाही त्याने पुरवला. चीनमध्ये, कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या हालचालींवर मोबाईल ट्रॅकिंगच्या सहाय्याने सातत्याने नजर ठेवली जात होती.यामुळे विषाणूचा इतरत्र प्रसार होण्यास आळा बसला. चीनी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गॉरिदमचा उपयोग केला. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर चायना मोबाईलच्या डेटाबेसच्या मदतीने, सरकारने आपल्या नागरिकांच्या हालचालींवर नजर ठेवली. अलिबाबा, बैदू आणि हुआवाई यांच्यासारख्या बड्या कंपन्यांबरोबर अनेक स्टार्टअप्सही विषाणूविरोधात संयुक्तपणे लढा देत आहेत. डॉक्टर्स, रूग्णालये, संशोधक आणि सार्वजनिक प्रशासन हे समन्वयाने काम करत आहेत.

अलिबाबाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करत अशी निदानात्मक प्रणाली विकसित केली आहे की, सेकंदात ती कोरोना विषाणूला शोधते. आतापर्यंत, ९६ टक्के अचूकता असलेल्या रुग्णांना तिने शोधले आहे. आरोग्यसेवा कर्मचारी आणि रूग्णालयांच्या मदतीला ही नवी प्रणाली धावून आली आहे. ब्ल्यू डॉट, ही कॅनडाची कंपनी कोरोना विषाणूच्या उद्रेकाविषयी सावधानतेचा इषारा देणारी परिली कंपनी होती. दररोज,या कंपनीची कृत्रिम बुद्धिमत्तानिर्माण, परिचालन आणि अंतरण प्रणाली ६५ भाषांमधील लाखो लेख, बातम्या आणि ब्लॉग्सची कसोशीने तपासणी करते.

३१ डिसेंबर, २०१९ रोजी तिने सार्ससारख्या भयानक विषाणूचा उद्रेक चीनच्या वुहानमध्ये होणार असल्याचा इशारा दिला होता. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ ला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याच्या ९ दिवस अगोदर हा इशारा देण्यात आला होता. ब्लू डॉट प्रणाली अधिकाऱ्यांना असा इषारा दिला होता की, मँडरिन भाषेतील एका लेखात वुहानच्या पावसाळी बाजारपेठेत भेट दिलेल्या २७ लोकांना तीव्र न्यूमोनियाचा त्रास होत असल्याचे सांगितले होते. ब्लू डॉटचे डॉक्टर्स, पशुवैद्यक, संसर्गजन्य आजारांचे तज्ञ, डेटा वैज्ञानिक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससह ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि मशिन लर्निंगचा वापर करून त्यांनी ६५ भाषांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विश्लेषण केले. आजाराच्या उद्रेकाची लक्षणे आढळल्यास त्यांना सतर्कतेचा इशारा मिळत असे. खरेतर, ब्लू डॉटनेच अमेरिकेला २०१६ मध्ये झिका विषाणूच्या प्रसाराचा इशारा दिला होता.

चीनमध्ये ८० टक्के व्यवहार हे रोकडविरहित आहेत. अलिपे आणि वुईचॅटसारख्या एप्सच्या माध्यमातून ते करण्यात येतात. चीनी अधिकारी या डेटाचा उपयोग करून त्याच्या नागरिकांच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवत असून तातडीने कृती करत आहेत. चीनची कम्युनिस्ट पार्टी टेहळणीसाठी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान वापरत आली आहे. या चेहरा ओळखण्याच्या कॅमेऱ्यांमध्येही आता औष्णिक सेन्सर्सने सुसज्ज केले असून व्यक्तिच्या शरिरातील तपमानही शोधले जाते. सेन्स टाईम या नावाच्या कंपनीने हे तंत्रज्ञान चालवण्यासाठी सॉफ्टवेअर पुरवले आहे. औष्णिक सेन्सर्ससह स्मार्ट हेल्मेट्स सिचुआन प्रांतात वितरित करण्यात आले आहेत. बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अत्यंत आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने, चीनी सरकारने सर्वसमावेशक आरोग्य टेहळणी प्रणाली विकसित केली आहे जिचं नाव आरोग्य संहिता आहे.

या संहितेमुळे सरकारला रुग्णांच्या प्रवासाच्या इतिहासाचे संसर्गग्रस्ताशी संपर्काचा कालावधी याबाबत ट्र्रॅकिंग ठेवता येते. अलिपे आणि वुई चॅट एप्स लोकांना ते बाहेर पडण्याचे धाडस करू शकतात का किंवा घरातच विलगीकरण कक्षात राहतील, हे शोधण्यासाठी मदत करत आहेत. या एप्समध्ये लाल, पिवळा आणि हिरवे कोड समर्थित केले आहेत. नागरिक त्यांच्या भागासाठी रंगसंहिता तपासून विलगीकरणातच रहायचे का, याचा निर्णय घेतात.

वुई चॅट, टेन्संट समूहाने विकसित केलेले अप असून चीनी नागरिकांना आरोग्यविषयक बुलेटिन पुरवत आहेत. प्रवास आणि पर्यटनात चॅटबॉट्सचा वापर करून, विमाने आणि गाड्यांची वास्तवातील चित्र देत आहेत. हुआवाई, टेन्संट आणि डीडीचे सुपरकॉंप्युटर्स कोविड-१९साठी औषध शोधण्यात संशोधकांना मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. हाँगकाँगपासून इस्त्रायल ते अमेरिकेपर्यंत, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग यांचा वापर नव्या कोरोनाविषाणुवरील लस शोधण्यासाठी केला जात आहे. हे प्रयोग यशस्वी झाले तरीही, लस जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे.

दरम्यान, इस्रायलकडून एक चांगली बातमी आहे. इस्रायली मिग्युएल संस्था चिकनमध्ये असलेल्या श्वसनाच्या आजाराचे तत्व शोधण्यावर प्रयोग करत आहे. या वैज्ञानिकांनी आपले प्रयोग विशिष्ट प्रकारच्या कोरोना विषाणूवर आधारित केले असून त्यांचा डीएनए नव्या सीओव्हीसारखाच आहे. मिग्युएल इन्स्टिट्यूटने आमचे संशोधन जर यशस्वी झाले तर ३ महिन्यांच्या आत लस जारी करू शकतात, असे जाहीर केले आहे. या लसीची प्रतीक्षा सारे जग उत्सुकतेने करत आहे. चीनी रुग्णालयांना दररोज किमान १ हजार सिटी स्कॅन दिवसाला एनसीओव्ही संसर्गाचे निदान करण्यासाठी घ्यावे लागतात. इनफॉर व्हिजन कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता उपायांमुळे या स्कॅनचा परिणाम जलदगतीने देण्यास सहाय्य होत आहे.

अलिबाबा समूहाच्या अँटी फिनान्शियल्स ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलदगतीने आरोग्य विम्याची रक्कम दिली जात आहे. या सर्व उपायांसह, रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण यांच्यातील समोरासमोर येण्याचा काळ आणि संवादाचा कालावधी महत्वपूर्णरित्या कमी झाला आहे. विषाणुचा रोबोंना संसर्ग होत नसल्याने, इमारती आणि सार्वजनिक जागांना निर्जंतुक करण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. चीन आधारित पुडु तंत्रज्ञानाने या रोबोंचे उत्पादन केले असून रुग्णांना अन्न आणि औषधे देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता टेरा कंपनीने तयार केलेले ड्रोन्सचा उपयोग परीक्षांचे निकाल आणि विलगीकरणासाठी लागणारी उपकरणे वितरित करण्यासाठी केला गेला. सार्वजनिक जागांवर एकत्र येणे आणि संक्रमण टाळण्यासाठी ते सातत्याने टेहळणी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.