डेहराडून - उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यानंतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. डोंगराळ भागामध्ये मदत पोहचवण्यासाठी प्रशासन हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये २ हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर सरकारने हवाई मार्गाने मदत पोहचवण्याचे थांबवले आहे.
-
Uttarakhand: Helicopter services to cloud-burst hit Arakot temporarily suspended after two helicopters crashed in the past 4 days, DM Uttarkashi Ashish Chauhan confirms.
— ANI (@ANI) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Uttarakhand: Helicopter services to cloud-burst hit Arakot temporarily suspended after two helicopters crashed in the past 4 days, DM Uttarkashi Ashish Chauhan confirms.
— ANI (@ANI) August 24, 2019Uttarakhand: Helicopter services to cloud-burst hit Arakot temporarily suspended after two helicopters crashed in the past 4 days, DM Uttarkashi Ashish Chauhan confirms.
— ANI (@ANI) August 24, 2019
आरकोट येथे हवाई मार्गाने केली जाणारी मदत थांबवल्याची माहिती उत्तरकाशी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष चौहान यांनी दिली. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. डोंगराळ भागामध्ये तारांना अडकल्यामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. पहिल्या दुर्घटनेमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत थोडक्यात जीवितहानी टळली. विजेच्या आणि रोपवेच्या तारा हवाई मार्गामध्ये अडथळा ठरत आहेत. त्यामुळे मदतकार्य थांबवण्यात आले.