चंदीगड - आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रसने ८४ सदस्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रणदीप सुरजेवाला, कुलदीप बिष्णोई, भुपिंदर सिंह हुडा यांचा समावेश आहे.
भुपिंदर सिंह हुडा गरही सम्पला किलोही येथून, बिष्णाई आदमपूर येथून तर सुरजेवाला कैथल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा - बस नदीत कोसळून भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, ३६ पेक्षा जास्त प्रवासी जखमी
इतर महत्त्वाचे नेते येथून लढवणार निवडणूक
किरण चौधरी - तोषाम मतदारसंघ, प्रदिप चौधरी - कलाल मतदार संघ, दिलू राम - गुहाला, कृष्णा हुडा - बरोडा मतदारसंघ, अंशुल सिंघला - जिंद मतदारसंघ, होशियारी लाल शर्मा - सिरसा मतदारसंघ, ओमप्रकाश पनघल - हंन्सी मतदारसंघ, रामनिवास राडा - हिसार मतदारसंघ
हेही वाचा - 'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'
राज्यामध्ये ९० विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्य महत्त्वाची टक्कर पाहायला मिळणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे.