लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांनंतर रेल्वे पोलिसही पत्रकारांशी गैरवर्तणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मालवाहतूक रेल्वेचे धिमानपुरा येथे डबे घसरलेल्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी निर्दयीपणाने मारहाण केली. पोलिसांनी तुरुंगात टाकून पत्रकाराचे कपडे काढले. तोंडात मलमूत्र विसर्जन केल्याचे पत्रकाराने सांगितले.
रेल्वे पोलिसांच्या दंडेलशाहीच्या प्रकाराची माहिती संबंधित पत्रकाराने वृत्तसंसंस्थेला दिली. पत्रकाराने म्हटले, ते रेल्वे पोलीस हे साध्या वेशात होते. त्यांनी कॅमेराला धक्का दिल्याने तो पडला. तो कॅमेरा घेतल्यानंतर त्यांनी शिवागीळ करत मारहाण केली.
उत्तर प्रदेश पोलिसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात ट्विट केल्याने स्वतंत्र पत्रकार प्रशांत कनौजिया यांना बेकायदेशीररित्या अटक केली होती. पोलिसांनी तुरुंगात मारहाण केल्याचा आरोपही कनौजिया यांनी केला होता. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश देवून मुलभूत स्वातंत्र्याची पाठराखण केली आहे.