ETV Bharat / bharat

मुले चोरल्याच्या संशयावरून जमावाकडून महिलेला मारहाण; गाझियाबादमधील घटना - suspicion child lifter ghaziabad

लोनी भागात जमावाकडून मुले चोर असल्याच्या संशयावरून एका महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली.

लोनी भागात जमावाकडून मुले चोर असल्याच्या संशयावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
author img

By

Published : Aug 28, 2019, 10:01 AM IST

Updated : Aug 28, 2019, 11:23 AM IST

गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी भागात जमावाकडून मुले चोर असल्याच्या संशयावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली.

संबंधित महिला तिच्या नातवासोबत खरेदीसाठी गेली असताना हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित स्त्री ही मुले चोरणाऱ्या टोळीतील असल्याचा संशयावरून जमावाने तिच्यावर हल्ला चढवला.

  • Ghaziabad: Woman thrashed by mob in Loni area on suspicion of her being child-lifter;police say,"she went there with her grandson for shopping when ppl attacked her.Strict action will be taken against those who circulated a video of her on social media calling her a child-lifter" pic.twitter.com/EnYCZROo6Z

    — ANI UP (@ANINewsUP) August 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पीडित महिला आक्रोश करताना दिसत असून, जमावाकडे बचावासाठी विनंती करत आहे.

ही महिला मुले चोरणाऱ्या टोळीतील असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक नीरज कुमार यांनी सांगितले आहे.

कायदा हातात घेण्यापेक्षा 100 नंबर वर फोन करून पोलिसांना मुले चोरणाऱ्यांबद्दल माहिती द्यावी. तसेच अशा घटना टाळण्यासाठी सोशल मीडियावरील मजकुराची सत्यता तपासूनच त्यावर विश्वास ठेवावा, अशी विनंती पोलीस प्रशासनाने केली आहे.

Intro:..

Body:..

Conclusion:..
Last Updated : Aug 28, 2019, 11:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.