ETV Bharat / bharat

नमस्ते ट्रम्प : असा असणार अमेरिकेच्या अध्यक्षांचा भारत दौरा..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची संपूर्ण रूपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे..

Full schedule of Trump's visit
नमस्ते ट्र्म्प : असा असणार अमेरिकेच्या अध्यक्षांचा भारत दौरा..
author img

By

Published : Feb 23, 2020, 6:48 PM IST

Updated : Feb 23, 2020, 8:04 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारतात असणार आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत अमेरिकेच्या प्रथम महिला मेलियाना ट्रम्पदेखील असणार आहेत. यावेळी ते भारतात विविध ठिकाणी भेट देतील. तसेच, अमेरिकेच्या दूतावासामध्ये एका बैठकीलाही ते उपस्थित राहतील.

त्यांच्या या दौऱ्याची संपूर्ण रूपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे..

२४ फेब्रुवारी -

  • डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेहून थेट अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील. यानंतर ते पंतप्रधान मोदींसह २२ किलोमीटर लांब असा रोड-शो करणार आहेत. यावेळी हजारो लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभारून त्यांचे स्वागत करतील.
  • यानंतर हे पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे मोतेरा स्टेडियमवर होत असलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात सहभागी होतील.
  • त्यानंतर, ट्रम्प आणि मोदी हे साबरमती आश्रमाला भेट देतील. साधारणपणे ३० मिनिटे ते तिथे असणार आहेत. यादरम्यान ट्रम्प यांना महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित पुस्तक आणि चरख्याची एक प्रतिकृती भेट म्हणून देण्यात येईल.
  • यानंतर त्याच दिवशी ते आग्र्याला रवाना होतील.
    Full schedule of Trump's visit
    असा असणार अमेरिकेच्या अध्यक्षांचा भारत दौरा..

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचे हवेतील व्हाईट हाऊस आणि बीस्ट कार, ही आहेत वैशिष्ट्ये

२५ फेब्रुवारी -

  • ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनामध्ये औपचारिक स्वागत केले जाईल.
  • त्यानंतर ते 'राजघाट'वरील महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहतील. नंतर, हैदराबाद हाऊस येथे ते दुपारचे जेवण घेतील.
  • यानंतर, ट्रम्प काही खासगी कार्यक्रमांना हजेरी लावतील.
  • त्यानंतर सायंकाळी, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ट्रम्प यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन करतील. या कार्यक्रमानंतर ट्रम्प हे मायदेशी रवाना होतील.

हेही वाचा : नमस्ते ट्रम्प : भारत-अमेरिकेदरम्यान होणार महत्त्वाचे सुरक्षा करार..

Last Updated : Feb 23, 2020, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.