ETV Bharat / bharat

दिनविशेष : 75 वर्षांपूर्वी झाली होती पहिली अणुचाचणी...मानवाचे अस्तित्व मिटवू शकणाऱ्या शक्तीचा वेध - अणुबॉम्ब चाचणी

अमेरिकेने अणुचाचणी जुलै 1945 ला घेतली. मात्र, त्याआधी पाच ते सहा वर्ष 'प्रोजेक्ट मॅनहॅनट अंतर्गत अणुबॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 1939 हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ. जर्मनीला थोपविण्यासाठी या सिक्रेट मिशन अंतर्गत अणुबॉम्ब तयार करण्याचा विडा अमेरिकेने उचलला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 16, 2020, 6:55 AM IST

हैदराबाद - मानवाला आधी कधीही माहित नसलेल्या संहारक अशा पहिल्या अणुबॉम्बची चाचणी अमेरिकेने 16 जुलै 1945 ला घेतली. या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर काही दिवसांतच अणुबॉम्बमुळे किती विध्वंस होऊ शकतो, हे सर्वांना दुसऱ्या महायुद्धात पाहायला मिळाले, जेव्हा अमेरिकेने जपानमधील नागासाकी आणि हिरोशीमा या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकला. या अणुहल्ल्यात लाखो लोक मारले गेले. त्यानंतर अनेक देशांमध्ये अण्विक शस्त्रे बनविण्याची स्पर्धा लागली, ती अद्यापही थांबलेली नाही. या सगळ्याची सुरुवात झाली अमेरिकेच्या पहिल्या अणुचाचणीनंतर. कशी होती अमेरिकेची पहिली चाचणी, जाणून घेऊ या लेखातून.

'प्रोजेक्ट मॅनहॅटन' एक सिक्रेट मिशन

अमेरिकेने पहिली अणुचाचणी जुलै 1945 ला घेतली. मात्र, त्याआधी पाच ते सहा वर्ष 'प्रोजेक्ट मॅनहॅनट अंतर्गत अणुबॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 1939 म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ. जर्मनीला थोपविण्यासाठी या सिक्रेट मिशन अंतर्गत अणुबॉम्ब तयार करण्याचा विडा अमेरिकेने उचलला. यामध्ये कॅनडा आणि इंग्लडचाही काही प्रमाणात सहभाग होता. 1939 साली अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली प्रोजेक्ट मॅनहॅटनची सुरुवात झाली.

या गुप्त मिशन अंतर्गत 'लॉस अ‌ॅलमॉस प्रयोगशाळे'ची स्थापना करण्यात आली. आण्विक संशोधन आणि सर्व प्रयोग येथे करण्यात आले. या प्रयोगशाळेला दुसरे गुप्त नाव 'प्रोजेक्ट एक्स' असे देण्यात आले होते. वैज्ञानिक दोन प्रकारच्या अणुबॉम्बच्या संशोधनावर प्रयत्न करत होते. युरेनियमवर आधारीत 'द लिटल बॉय आणि प्लुटोनियमवर आधारित 'द फॅट मॅन'. जर्मन गुप्तचरांचा धोका असल्यामुळे सर्व काम अत्यंत गुप्तपणे आणि निर्जनस्थळी करण्यात येत होते.

पहिली अणुचाचणी 'ट्रिनिटी टेस्ट'

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर पहिली अणुचाचणी घेण्याची वेळ आली. या चाचणीला 'ट्रिनिटी टेस्ट' असे गुप्त नाव देण्यात आले. अमेरिकेतील 'न्यू मेक्सिको' राज्यातील वाळवंटात ही चाचणी घेण्याचे ठरले. या चाचणीला ट्रिनिटी हे नाव जॉन डोन्स या लेखकाच्या कवितांपासून प्रेरणा घेवून देण्यात आले होते. चाचणीसाठी जो अणुबॉम्ब तयार करण्यात आला होता, त्याला 'द गॅझेट' असे कोड नेम देण्यात आले होते.

16 जुलै 1945 ला सकाळी चार वाजता चाचणी घेण्याची वेळ ठरली होती. मात्र, वाळवंटात येणाऱ्या वादळामुळे चाचणी दीड तास उशिरा म्हणजे साडेपाचला घेण्याचे ठरले. एका स्टीलच्या आवरणावर बॉम्ब ठेवण्यात आला होता. चाचणी झाल्यानंतर काही वेळातच वाळवंटात उंच आकाशात तब्बल 40 हजार फूट उंचीचे मशरुमच्या आकराचे ढग दिसायला लागले. अणुचाचणीनंतर अवकाशात पसरलेले ते प्रदुषण होते. हे चित्र जगातील पहिल्या अणुचाचणी नंतरचे होते.

अणु चाचणीचा खर्च

प्रोजेक्ट मॅनहॅटनसाठी अमेरिकेला तब्बल 2 अब्ज डॉलर खर्च आला. सुरुवातील या प्रकल्पाला फक्त सहा हजार डॉलर मंजूर करण्यात आले होते. मात्र, अमेरिकेने 1941 साली दुसऱ्या महायुद्धात उडी घेतल्यानंतर प्रकल्पाचा खर्च वारेमाप वाढला.

अमेरिकेनंतर इतरही अनेक देशांनी अणुचाचणी घेतली. मात्र, चाचणी घेण्याचे ठिकाण कायमच वादात राहिले. यातील अनेक चाचण्या ह्या ग्रामीण भाग, अल्पसंख्य समुदाय राहत असलेला प्रदेश किंवा मोठ्या महासत्तांच्या ताब्यात असलेल्या गरीब वसाहतींमध्ये करण्यात आल्या.

रशियाने अणुचाचणी कझाकिस्तान या देशात केली. तर चीनने अल्पसंख्यांक ऊईघुर या मुस्लिम अल्पसंख्य राहत असलेल्या जिंझियांग प्रांतात केली. इंग्लडने आपली वसाहत ऑस्ट्रेलियामध्ये अणुचाचणी केली. तर फ्रान्सने अणुचाचणी त्यांच्या ताब्यात असलेल्या अल्जिरिया देशात केली. अणुचाचणीचे जे काही दुरगामी परिणाम होतील ते आपल्या देशापासून किंवा मुख्य भूमीपासून दुर व्हावेत, याकडे महासत्तांचा कल राहिला.

कोणत्या देशाकडे किती अण्विक शस्त्रे

अमेरिकेकडे 5 हजार 800 आण्विक शस्त्रे असून त्यांनी तब्बल 1 हजार 30 चाचण्या घेतल्या आहेत.

रशियाकडे 6 हजार 375 आण्विक शस्त्रे असून त्यांनी 715 चाचण्या घेतल्या आहेत.

इंग्लड - आण्विक शस्त्रे - 215 एकूण चाचण्या 42

फ्रान्स - आण्विक शस्त्रे - 290 एकूण चाचण्या 210

चीन - आण्विक शस्त्रे 320 एकूण चाचण्या 45

भारत - आण्विक शस्त्रे 150 एकूण चाचण्या 3

पाकिस्तान आण्विक शस्त्रे 160 एकूण चाचण्या 3

उत्तर कोरिया - आण्विक शस्त्रे 30 ते 40 एकूण चाचण्या 6

इज्राईल आण्विक हत्यारे 90

अणूशक्तीचा वापर शांततेसाठी

अमेरिकेने पहिल्यांदा चाचणी केल्यानंतर अणूचाचण्या करण्यासाठी जणू शर्यतच लागली. त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात आली. अणु तंत्रज्ञानाचा शांततापूर्वक वापर करण्यासाठी 'इंटरनॅशनल अ‌ॅटोमिक एनर्जी एजन्सी'ची स्थापना 1957 साली करण्यात आली. तर 5 ऑगस्ट 1963 ला अमेरिका, इंग्लड आणि रशियाने अणू चाचणी प्रतिबंधक करारावर सह्या केल्या. या कराराअंतर्गत समुद्रात व अवकाशात अणुचाचणी घेण्यास मनाई करण्यात आली.

1968 साली अणु तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन करार करण्यात आला. त्यानुसार एका देशाकडून अणुबॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान दुसऱ्या देशाकडे हस्तांतरीत होणार नाही, यावर एकमत झाले. मात्र, त्यानंतरही अनेक देशांकडे अणुतंत्रज्ञान पोहचले आहे.

अन.. तिसरे महायुद्ध होता होता वाचले....

दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश सावरत असतानाच अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली. लोकशाहीवादी अमेरिका आणि कम्युनिस्ट विचारसरणीचा रशिया यांच्या वादात अनेक देश भरडले गेले. एकमेकांच्या जवळच्या राष्ट्रांना आपल्या गटात ओढण्याची स्पर्धा सुरु झाली.

अमेरिकेच्या दक्षिणेला असणारा क्युबा हा देश शीतयुद्धाचे केंद्र ठरला. या देशामध्ये रशियाचा वाढता प्रभाव पाहून अमेरिका हतबल होती. त्यातच रशियाने क्युबामध्ये अणुबॉम्ब ठेवण्याचे नियोजन आखले. रशियाच्या या निर्णयामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला. क्युबामध्ये अनेक गुप्त ठिकाणी मिसाईल ठेवण्यासाठी जागा तयार करण्यात आल्या होत्या. दोन्ही महासत्तांमध्ये महायुद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अमेरिकेने पॅसिफिक महासागरात आपल्या नौसेनेची जहाजे तैनात केली. रशियाकडून येणारे प्रत्येक जहाज तपासूनच क्युबामध्ये सोडण्यात येत होते. यास 'क्युक्लिअर ब्लॉकेड' असेही म्हणतात. तत्कालीन नेतृत्वाने विस्तृत चर्चेनंतर आणि समजूतदारपणे निर्णय घेतल्यामुळे महायुद्ध टळले. या घटनेस 'क्युबन क्राईसीस' असेही म्हणतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.