नवी दिल्ली - 'व्यायाम करा, धान्य दळा' हे वाचून आश्चर्य वाट्ल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीच्या नोएडा भागात 'शिल्पोत्सव' प्रदर्शन आयोजित केले आहे. यात धावण्याच्या मशिनद्वारे (पिठाची गिरणी) ज्वारी व गहू दळून मिळतो. यामुळे एकावेळी दोन कामे पुर्ण होण्याचा प्रत्यय येत आहे. डॉ. अमित मिश्रा या व्यक्तीने ही मशिन बनवली असून तीच देशभरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा - पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरावादरम्यान दोघांचा मृत्यू
एएसवाय पिठाच्या गिरणीचे विपणन व्यवस्थापक अविनाश मिश्रा म्हणाले, "मशिनवर 20 मिनिटे व्यायाम केला, तर 1 किलो पीठ दळून होते. ज्यापासून तब्बल 300 कॅलरी उर्जा मिळते. विशेष म्हणजे ही मशिन चालवण्यासाठी विद्युतधारेची गरज लागत नाही. तसेच मशिनद्वारे मसाले, धान्ये दळू शकता."
मशिनला लावलेल्या वेगाच्या मिटरमुळे वेग, पीठाचे प्रमाण, कॅलरी आणि वेळ अशी इत्यंभूत माहिती मिळते. अमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळावर ही पिठाची गिरणी विकत घेण्याची संधी आहे.
हेही वाचा - अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाच्या कामात 'एजंटगिरी'चा सुळसुळाट