नवी दिल्ली - डगमगलेली अर्थव्यवस्था, जीडीपी, कोरोना, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन अशा अनेक मुद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदींवर टीका केली आहे. भारतापेक्षाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने कोरोना परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे.
-
Another solid achievement by the BJP government.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Even Pakistan and Afghanistan handled Covid better than India. pic.twitter.com/C2kILrvWUG
">Another solid achievement by the BJP government.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 16, 2020
Even Pakistan and Afghanistan handled Covid better than India. pic.twitter.com/C2kILrvWUGAnother solid achievement by the BJP government.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 16, 2020
Even Pakistan and Afghanistan handled Covid better than India. pic.twitter.com/C2kILrvWUG
भारताची ढासाळत चाललेली अर्थव्यवस्था आणि जीडीपीमधील घसरण यावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) चिंता व्यक्त केली आहे. या आर्थिक वर्षांत भारताच्या जीडीपी वृद्धीमध्ये 10 टक्के घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच भारताची वृद्धीही बांगलादेशापेक्षाही कमी राहणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. यावरून राहुल गांधींनी टीका केली आहे. टि्वटमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा चार्ट शेअर केला आहे. यामध्ये भारताचा जीडीपी 10.30 टक्के तर अफगाणिस्तानचा 5 टक्के आणि पाकिस्तान उणे 0.40 टक्का वर्तवला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (आयएमएफ) अहवाल जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश होण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. एकूण जीडीपीच्या अंदाजावर नजर टाकल्यास बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि मालदीव सारखे देश भारताच्या पुढे जातील. तर फक्त पाकिस्तान आणि नेपाळ भारताच्या मागे राहतील. तथापि, या अहवालात असेही म्हटले आहे की, 2021मध्ये भारत 8.8 टक्क्यांच्या वाढीसह आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून परत येऊ शकेल, असेही अहवालात म्हटले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी व्हीव्हीआयपी जेट खरेदी केल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या जवानांचा एक व्हिडीओ शेअर केला. एकीकडे मोदींसाठी 8400 कोटींचे जेट खरेदी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे जवानांचा जीव धोक्यात घालून त्यांना नॉन-बुलेटप्रूफ ट्रकमधून पाठवण्यात येत आहे. हा कसला न्याय, असे टि्वट राहुल गांधींनी केले होते.