ETV Bharat / bharat

कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षिततेवरुन प्रश्नचिन्ह... पीपीई कीटच्या गुणवत्तेबाबत डॉक्टरांमध्ये साशंकता

देशाचे कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु आहे. यातच आता आरोग्य कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. याचे एक कारण म्हणजे कमी गुणवत्तेचे पीपीई कीट. अनेक डॉक्टर आणि अधिकारी यांच्याकडून आता पीपीई कीटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

All India Institute Of Medical Science new delhi
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान
author img

By

Published : May 2, 2020, 10:33 AM IST

नवी दिल्ली - देशाचे कोरोनासोबतचे युद्ध सुरु आहे. यातच आता आरोग्य कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. याचे एक कारण म्हणजे कमी गुणवत्तेचे पीपीई कीट. अनेक डॉक्टर आणि अधिकारी यांच्याकडून आता पीपीई कीटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोनाचे लक्षण दिसून येत नसलेल्या परंतुव बाधित असलेल्या आणि कोरोना प्रभाव नसलेल्या, असा दोन्ही ठिकाणी डॉक्टरांना काम करावे लागते. अशा वेळी कमी गुणवत्तेच्या पीपीई कीटमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात येत आहे.

नवी दिल्ली : पीपीई कीटच्या गुणवत्तेबाबत डॉक्टरांमध्ये साशंकता....

कोरोनाची लक्षणे दिसून येत नसलेले मात्र कोरोनाची लागण झालेले रुग्ण सर्वाधित धोकादायक असतात. अशा रुग्णांमुळे कोरोनाचे संक्रमण सर्वाधिक होत असते. मुळात असा रुग्णांना आपण कोरोनाचे संक्रमण करत आहोच, याची पुसटशी क्लपना देखील नसते.

हेही वाचा... कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक

पीपीई कीटची गुणवत्ता ढिसाळ

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी आणि एम्स रेजिडेंट डॉक्टर्स एसोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदर्श सिंह यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचारी हे कोरोनाचे खरे योद्धे आहेत. मात्र त्यांच्या बचावासाठी दिले जाणारे पीपीई कीट हे अतिशय खालच्या दर्जाचे आहेत. खुप सारे डॉक्टर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना आवश्यक त्या इतर सुविधा देखील दिल्या जात नाहीत. मात्र, त्यात महत्वाचे असे पीपीई कीट देखील कमी दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी या कोरोना योद्ध्यांनाच कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. आदर्श सिंह यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.