नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात मृतांचा आकडा वाढून ३३ झाला आहे. गोकुळपुरी भागातील एका नाल्यात पोलिसांना दोन मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तर लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालयातील एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सर्वात जास्त हिंसा सोमवारी आणि मंगळवारी झाली. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून आज कोठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. संवेदनशील भागांमध्ये पोलीस 'फ्लॅग मार्च' करत आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना दिलासा देत आहेत. त्यामुळे लोकांमधील भीतीचे वातावरण कमी होत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बाबरपूर, मौजापूर, जाफराबाद येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.