नवी दिल्ली - राजधानीमधील हवेचा स्तर खालावल्यामुळे सर्व शाळांना ५ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आज शाळा पुन्हा सुरू झाल्या असून विद्यार्थी मास्कचा वापर करून शाळेत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-
Delhi: Students wear anti-pollution masks to schools,
— ANI (@ANI) November 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
as the air quality continues to be poor. pic.twitter.com/vxMT07E3hU
">Delhi: Students wear anti-pollution masks to schools,
— ANI (@ANI) November 6, 2019
as the air quality continues to be poor. pic.twitter.com/vxMT07E3hUDelhi: Students wear anti-pollution masks to schools,
— ANI (@ANI) November 6, 2019
as the air quality continues to be poor. pic.twitter.com/vxMT07E3hU
प्रदूषण कमी करण्यासाठी केजरीवाल सरकारकडून शहरामध्ये 'ऑड-इव्हन' नियम लागू करण्यात आले आहेत. या फॉर्म्युल्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आजचा तिसरा दिवस आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये हवेचा स्तर 500 निर्देशांकावर पोहोचला होता. प्रदुषणामुळे शहरामध्ये आरोग्य आणिबाणी आली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.
लक्ष्मीपूजनापासून दिल्लीच्या हवेचे स्वास्थ बिघडले आहे. दिवाळीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आल्याने हवेची गुणवत्ता ढासळली. खराब हवेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.