ETV Bharat / bharat

मरकज धार्मिक कार्यक्रमप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संचारबंदी लागू असतानाही धार्मिक कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी आदेशांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी साथीचा आजार कायदा आणि भारतीय दंडविधाननुसार मौलाना साद आणि इतर तबलीघी जमात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

delhi police register case for illegally arranging makraz event
मकरज धार्मिक कार्यक्रम
author img

By

Published : Mar 31, 2020, 8:46 PM IST

Updated : Mar 31, 2020, 10:02 PM IST

नवी दिल्ली - शहरातील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत उपराज्यपालांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

  • Case registered against Maulana Saad & others of Tableeghi Jamaat under Epidemic Disease Act 1897 & other sections of IPC for violation of government directions given to the management of Markaz of Basti Nizamuddin, regarding restrictions on gatherings: Delhi Police Commissioner pic.twitter.com/4DBwjA0N1B

    — ANI (@ANI) March 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संचारबंदी लागू असतानाही धार्मिक कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी आदेशांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी साथीचा आजार कायदा आणि भारतीय दंडविधाननुसार मौलाना साद आणि इतर तबलीघी जमात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगाणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता.

निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले.

Last Updated : Mar 31, 2020, 10:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.