शिमला - तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवताना सरकारने काही प्रमाणात सूट जाहीर केली आहे. त्यामुळे काही राज्यात बाजारपेठा सुरु होताना दिसत आहे. हिमालचप्रदेशातही बाजापेठा उघडल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. तब्बल ४० दिवसानंतर दुकाने उघडली आहेत.
ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बंधन शिथिल करण्यात आली आहेत. तर रेडझोनमध्ये कडक निर्बंध आहेत. शिमला शहरातील लोअर बाजार परिसर उघडल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, प्रशासनाने बाजारपेठा सुरू ठेवण्याबाबत काही बंधने ठेवली आहेत. बाजारातील फक्त एका बाजूचे दुकाने आज सुरू करण्यात आली आहेत. तर उद्या दुसऱ्या बाजूचे दुकाने चालू ठेवण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक सेवांसह कपडे, धाबे, भांड्याची दुकाने यासह इतर दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, ब्युटी पार्लर, सलून बंद ठेवण्यात आली आहेत. दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी २.३० पर्यंत ठेवण्यात आली आहे. बाजारातील ही गर्दी पुढे जाऊन सर्वांसाठी धोकाही बनू शकते.