नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. आसाममध्ये गेल्या 24 तासांत 814 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 588 रुग्ण हे एकट्या गुवाहटी शहरात आढळली आहेत.
आसाममधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 336 वर पोहोचली आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 8 हजार 329 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 4 हजार 988 रुग्णांवर राज्यातील सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी चाचणी हा योग्य मार्ग आहे. राज्यात आतापर्यंत 4 लाख 85 हजार 156 चाचण्या घेण्यात आल्या आहेत, हेमंत बिस्वा यांनी सांगितले.
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सात लाख पार झाला आहे. कोरोनामुळे देशभरात मागील 24 तासात 467 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 20 हजार 160 इतकी झाली आहे.