हैदराबाद - देशात कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकूण 73 लाख 7 हजार 97 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर यामध्ये 8 लाख 12 हजार 390 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 63 लाख 83 हजार 441 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 1 लाख 11 हजार 266 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
महाराष्ट्र - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची राज्यनिहाय आकेडवारी पाहता, कोरोनाचा सर्वांत जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीमुळे एका कोरोना रुग्णांचे प्राण वाचले आहेत. 65 वर्षीय कोरोना रुग्णाला प्लाझ्माची गरज पडल्यानंतर ठाणे पोलिसांना मदत मागण्यात आली. संबधित B+ve प्लाझ्माची गरज आहे, असा संदेश ठाणे पोलिसांना मिळाला. त्यावर सहाय्यक उपनिरीक्षक नटराजेश्वर अंदलकर यांनी रुग्णाला प्लाझ्मा दान केला.
पंजाब - राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 6 महिन्यांनंतर शाळा आणि कॉलेज सुरू होणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या गाईडलाईननुसार सर्व शाळा सुरू केले जाणार आहेत.
तामिळनाडू - माजी आमदार आणि अम्मा मक्कल मुन्नेतरा पक्षाचे नेते पी. वेट्रीवेल यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले आहे.
केरळ - शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. शनिवारपासून मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश - 15 ऑक्टोबर हा दिवस 'ग्लोबल हँड वॉशिंग डे 'म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निमित्ताने स्वच्छता जागरूकतेविषयी अभियान राबवले आहे.
ओडिशा - मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. ओडिशामध्ये 22 हजार 716 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 62 जणांचा मृत्यू झाला आहे.