हैदराबाद : काही दिवसांमध्ये सणवार सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. विविध सणांमध्ये होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासंबंधी ही नियमावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी ४८ टक्के मृत्यू हे केवळ २५ जिल्ह्यांमधील आहेत. यामधील १५ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.
या पार्श्वभूमीवर पाहुयात देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...
- नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट आता कमी होत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले. १७ सप्टेंबरला दिल्लीत सर्वाधिक ४,५०० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, असे केजरीवाल म्हटले. दुसरी लाटही आता हळूहळू ओसरेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
- मुंबई : राज्यात मंगळवारी कोरोना विषाणूची लागण झालेल्या १२ हजार २५८ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ३७० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यभरातून आज १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्के एवढे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मंगळवारी राज्यात १२ हजार २५८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहचला आहे. राज्यात आज ३७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यभरातील मृतांचा एकूण आकडा ३८ हजार ७१७ वर पोहचला आहे. राज्यातील मृत्यू दर २.६४ टक्के इतका आहे. आज राज्यात १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्के एवढे झाले आहे.
- बंगळुरू : कोरोनाबाधित असूनही चाचणी करत नसल्याने राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास कर्नाटक सरकारला अडचणी येत आहेत.
दरम्यान, राज्यातील काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डी. के. सुरेश यांच्या घरावर छापे मारले होते. त्यानंतर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सुरेश यांनी सांगितले आहे.
- चंदीगढ : पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिंधू हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. सिंधू यांनी सोमवारी राहुल गांधींसोबत त्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता.
हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंग चौटाला हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.