ETV Bharat / bharat

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

गेल्या २४ तासात देशात ८० हजार ४७२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून १ हजार १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली आहे.

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Oct 1, 2020, 2:03 AM IST

हैदराबाद - जगभरात सध्या कोरोनाचे संकट आहे. जॉर्जिया विद्यापीठाच्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, कोरोनाचा संसर्ग हा हवेतून होऊ शकतो. कोरोनाचा समूह संसर्ग होत असल्याचेही संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. चीनमधील एक प्रवासी बसमधून प्रवास करत असताना एअर कंडिशन्डमधून हा व्हायरस पसरला असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ८० हजार ४७२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून १ हजार १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र -

राज्यातील लॉकडाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी काही नियम आणि अटीही ठरवण्यात आल्या आहेत. राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यासही हिरवा कंदिल दाखवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचा विचार करता रेल्वे लवकर सुरू करण्यात आली असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच हॉटेल्स आणि बार व्यावसायिकांना केवळ ५० टक्केच क्षमतेने आपला व्यवसाय सांभाळण्यास सांगितले आहे.

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

तेलंगणा -

तेलंगणातील कोरोना रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांवर गेला आहे. दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आहे. गेल्या २४ तासात २ हजार २४३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १ लाख ६० हजार ९३३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेश -

राज्यात कोरोना चाचण्यांचा आकडा १ कोटींपेक्षा जास्त झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. आम्ही गेल्या ४५ दिवसात दररोज दीड लाख चाचण्या केल्या आहेत. ६ महिन्यांपूर्वी कोरोनासोबत लढा देण्याची आमची क्षमता नव्हती. आम्ही रुग्णांना दिल्लीला जाण्यास सांगत होते. मात्र, आता आम्ही राज्यातील रुग्णालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले.

आंध्र प्रदेश -

राज्यात नव्या ६ हजार १३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ६.९ लाखांहून अधिक झाली आहे. आज ७ हजारांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. आतापर्यंत आंध्र प्रदेशात ५ हजार ८२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटक -

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या राज्यातील भाजप सरकार लपवत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला आहे. कोरोनासंदर्भात अनेक विषय सरकार जाणीवपूर्वक लपवत असल्याचे टि्वट सिद्धरामय्या यांनी केले आहेत.

ओडिशा -

कोरोना काळातील योग्य व्यवस्थापनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओडिशा सरकारचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर एक लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये त्यांनी ओडिशा सरकारचे विशेष कौतुक केले आहे. कोरोना आणि अॅम्फन वादळ अशा दोन्ही पातळ्यांवर ओडिशा सरकार सक्षमपणे काम करत असल्याचे डब्लूएचओने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.