नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी देशातील रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरामध्ये महाराष्ट्रात ८१, तर तामिळनाडू मध्ये ७५ नवे रुग्ण आढळून आले. देशात सध्या कोरोनाचे एकूण २,३०१ रुग्ण आहेत. यांपैकी २,०८८ रुग्ण हे अॅक्टिव आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक (४१६) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू (३०९) आणि केरळचा (२८६) क्रमांक लागतो. देशात आतापर्यंत कोरोनाचे ५६ बळी आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक २० बळी आढळून आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत एकूण १५६ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. यांपैकी बहुतांश रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. यावेळी त्यांनी लॉकडाऊनला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. आज देशव्यापी लॉकडाऊनला 9 दिवस पूर्ण होत आहेत. देशात जरी लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नसून १३० कोटी लोक एकत्र आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा : आग्र्यात कोरोनाबाधितांची संख्या 20 वर, आकडा वाढण्याची भीती