नवी दिल्ली - देशभरात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ७७३ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५,१९४ झाली आहे.
देशातील एकूण रुग्णांपैकी ४,६४३ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ४०१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ३५ नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा १४९ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
-
#UPDATE: A total of 35 new deaths and 773 new positive cases have been reported in the last 24 hours as India's total number of #Coronavirus positive cases stand at 5194. https://t.co/I92ThAt5um
— ANI (@ANI) April 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE: A total of 35 new deaths and 773 new positive cases have been reported in the last 24 hours as India's total number of #Coronavirus positive cases stand at 5194. https://t.co/I92ThAt5um
— ANI (@ANI) April 8, 2020#UPDATE: A total of 35 new deaths and 773 new positive cases have been reported in the last 24 hours as India's total number of #Coronavirus positive cases stand at 5194. https://t.co/I92ThAt5um
— ANI (@ANI) April 8, 2020
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (१,०१८) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळानाडू (६९०) आणि दिल्लीचा (५७६) क्रमांक लागतो. तर सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रातच (६४) गेले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात (१४) आणि मध्य प्रदेशचा (१३) क्रमांक लागतो.
हेही वाचा : Coronavirus : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ