ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १७ राज्यातून हद्दपार तर, 'या' राज्यांत एकुलता 'एक'

कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभेत सत्ता मिळूनही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. या ठिकाणी काँग्रेसचे पानीपत झालेले पाहायला मिळाले.

author img

By

Published : May 24, 2019, 2:01 PM IST

नवी दिल्ली - देशातील १७ व्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा आणि जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झालेला पाहायला मिळाला आहे. तर, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभुतपूर्व यश मिळाले आहे. या निवडणुकीत देशातील १७ राज्यांतून काँग्रेस हद्दपार झाली आहे. देशात २७ पैकी ९ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभेत सत्ता मिळूनही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. या ठिकाणी काँग्रेसचे पानीपत झालेले पाहायला मिळाले.
मध्यप्रदेश -
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला मोठे यश मिळेल, असे म्हटले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मध्यप्रदेशातील २९ जागांवर भाजपने विजय मिळवाला. तर काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे या ठिकाणाहून काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र -
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींविरोधात प्रचार केला होता. पण तरीही त्याचा काँग्रेसला फायदा झाला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने सर्व जागांवर उमेदवार दिल्याने त्याचा दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे एकमेव निवडून आले आहेत.

उत्तर प्रदेश -
उत्तर प्रदेशात बसपा-सपा आघाडी आणि काँग्रेस वेगवेगळे लढल्यामुळे त्याचा फायदा भाजपला जास्त झाला. उत्तर प्रदेशातील ८० पैकी केवळ एकाच जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची परंपरागत सीट असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.
पद्दूचेरी -
या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
ओडिशा -
ओडीशा या राज्यात काँग्रेस विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र, याठिकाणीही काँग्रेसची धुळधाण झालेली पाहायला मिळाली. ओडिशात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे.
मेघालय -
मेघालय राज्यात २ पैकी एका जागेवर काँग्रेसला यश मिळाले आहे.
कर्नाटक -
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जेडीएसच्या साथीने आपली प्रतिष्ठा राखली होती. त्यानंतर आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत चांगल्या यशाची अपेक्षा काँग्रेस करत होते. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचाही येथून धक्कादायकरित्या पराभव झाला आहे.
झारखंड -
झारखंड राज्यातही काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
गोवा -
गोवा राज्यातही काँग्रेसचा एकच शिलेदार निवडून आला आहे.
बिहार -
बिहारमध्येही काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळवता आली आहे.
अंदमान आणि निकोबार -
अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.