ETV Bharat / bharat

राहुल गांधींचा राजीनामा एकमुखाने फेटाळला.. काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठकीत पराभवावर आत्मचिंतन - राहुल गांधी

राहुल गांधींना देशातील प्रश्नांची जाणीव झाली आहे. नवीन अध्यक्ष निवडल्यास पुन्हा त्या व्यक्तीला सर्व गोष्टी समजण्यासाठी पाच वर्षे लागतील, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींना राजीनामा देण्याची गरज नाही - काँग्रेस
author img

By

Published : May 25, 2019, 4:49 PM IST

Updated : May 25, 2019, 5:17 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस कार्यकारणीची बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राहुल गाधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. मात्र, कार्यकारिणीने तो एकमुखाने फेटाळून लावला. सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधींचे नेतृत्वच काँग्रेसला उभारी देऊ शकते, असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशातील लोकशाही धोक्यात आली असून काँग्रेस या प्रवृत्तीला नेहमी विरोध करत राहील. काँग्रेसचा पराभव हा विचारांचा पराभव नसून केवळ जागांच्या आकडेवारीचा पराभव आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणी सांभाळली आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी देशभर फिरून प्रचार केला. काँग्रेसचे विचार त्यांनी तळापर्यंत पोहचवले. त्यांना देशातील समस्यांचा अभ्यास झाला आहे. शिवाय काँग्रेसच्या संघटनाची रणनितीही त्यांना उत्तम माहिती झाली आहे. राहुल गांधींचा राजीनामा घेऊन नविन व्यक्तीला अध्यक्ष निवडल्यास त्या व्यक्तीला पुन्हा ५ वर्षे काँग्रेस कार्यप्रणाली समजण्यास लागतील. त्यामुळे राहुल गांधीच अध्यक्षपदावर राहतील, असे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार नसून भाजपने खोटा प्रचार करून देशाची दिशाभूल केली आहे. देशातील कोट्यवधी मतदारांनी आमच्यावरही विश्वास टाकला. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, असे जेष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी सांगितले.

Intro:Body:

Nationl

Conclusion:
Last Updated : May 25, 2019, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.